Israel Hamas War : इस्रायल आणि हमास (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाचा आज 31 वा दिवस आहे. हा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. इस्रायल (Israel) कडून गाझा पट्टी (Gaza Strip) त तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हमासने इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवलं आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार, हमासने ओलिस ठेवलेल्या तीन महिलांचा व्हिडीओ जारी केला आहे. हमासने सुटकेसाठी आवाहन करणाऱ्या ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा व्हिडीओ जारी केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं होतं.
हमासने महिला ओलिसांचा व्हिडीओ जारी केला
हमासने जारी केलेल्या 76 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तीन इस्रायली महिला दिसत आहेत. यामध्ये एक महिला म्हणतेय, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू लोकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. या महिलेने पंतप्रधान नेतन्याहू यांना आपल्या सुटकेसाठी ओलिसांची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन केलं आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या महिलांना इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान 7 ऑक्टोबर रोजी हमासने ओलीस ठेवले होते. एलेना ट्रुपानोव, डॅनियल अलोनी आणि रॅमन किर्ष्ट अशी ओलीस ठेवलेल्यांची नावे आहेत.
गेल्या 24 दिवसांपासून युद्ध सुरूच
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या 24 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने काही मिनिटांत गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले. हमासच्या दहशतवाद्यांनीही इस्रायलमध्ये घुसून सुमारे 1000 हून अधिक लोकांची हत्या केली. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायल हल्ल्यावेळी इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं आणि त्यांना ओलिस ठेवलं आहे. हमासने सुमापरे 200-250 इस्रायलींना ओलिस ठेवलं आहे. इस्रायलने ओलिसांच्या सुटकेसाठी गाझा पट्टीमध्ये ग्राउंड ऑपरेशन तीव्र केलं आहे.
आतापर्यंत 9500 हून अधिक लोकांचा मृत्यू
इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत सुमारे 9500 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, युद्धात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने अजूनही 200 हून अधिक इस्रायली लोकांना बंदी बनवलं आहे.