Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टिनी  (Israel Palestine Conflict) यांच्यातील युद्ध (War) दिवसेंदिवस अधिक विनाशकारी होत आहे. या युद्धामध्ये हजारो नागरिक ठार झाले आहेत. इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) कडून सातत्याने एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात 4200 हून अधिक नागरिक ठार (Israel Hamar War Death Toll) झाले आहेत. तर सुमारे 200 नागरिकांना हमासने ओलीस ठेवलं आहे. मृतांमध्ये इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांसह परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये संगीत महोत्सवासाठी (Israel Music Festival) गेलेल्या एका इस्रायली-अमेरिकन वंशाच्या महिलेचा (Israel-Americam Women) हमासच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तिच्या वडीलांनी अ‍ॅपल वॉच (Apple Watch) च्या मदतीने या महिलेचा मृतदेह शोधला.


अ‍ॅपल वॉचच्या मदतीने महिलेचा मृतदेह


7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला. हमासने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा केला. हमासचने इस्रायलवर जमीन, पाणी आणि वायू अशा तिन्ही मार्गांनी हल्ला केला. 7 ऑक्टोबरला हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी नागरिकांना लक्ष्य केलं. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमधील एका संगीत महोत्सवावर हल्ला केला. या संगीत महोत्सवात देश-विदेशातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमावर हल्ला करत हमासच्या दगशतवाद्यांनी 260 लोकांची हत्या केली. यातील अनेक मृतांची ओळख पटत नव्हती. 


मोबाईलमधील ट्रॅकिंग फिचरचा वापर


एक इस्रायल-अमेरिकन वंशाच्या महिला या नोव्हा संगीत महोत्सवात उपस्थित होती, मात्र दुर्दैवाने हमासच्या हल्ल्यात ती मारली गेली. मृतांची ओळख पटवणं कठीण जात होतं. दरम्यान, यावेळी या महिलेच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी तिच्या वडीलांनी अ‍ॅपल वॉचचा वापर केला. इस्त्रायली-अमेरिकन महिलेच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी अ‍ॅपल वॉच आणि मोबाईलमधील ट्रॅकिंग फिचरचा वापर मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी केला आणि मृतदेहाची ओळख पटवली.


कसा शोधला मृतदेह?


सीएनएनच्या अहवालानुसार, हमास गटाच्या सैनिकांनी मारल्या गेलेल्या इस्त्रायली-अमेरिकन महिलेचे वडील इयल वाल्डमन (Eyal Waldman) यांनी म्हटलं आहे की, 24 वर्षीय डॅनिएल दक्षिण इस्रायलमधील संगीत महोत्सवाच सहभागी झाली असताना हमासच्या सैनिकांनी अचानक हल्ला झाला. या घटनेची बातमी मिळाल्यानंतर, इयल वाल्डमन यांना आधी वाटलं की, हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या मुलीचं अपहरण केलं आहे, पण काही दिवसांनी त्यांना समजलं डॅनियल आणि तिचा प्रियकर नोम शाई यांची हमासच्या दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे.


लवकरच लग्न होणार होतं


इयल वाल्डमन यांनी सांगितलं की, "आम्ही इस्रायलमध्ये उतरल्यानंतर तीन तासांनी, मी दक्षिणेकडे निघालो आणि मला डॅनियल आणि तिच्या प्रियकराची कार सापडली. डॅनिएलने तिच्या फोनवरून आम्हाला आणीबाणीचा क्रॅश कॉल केला होता. या कारवर चारही बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ज्याच्या खुणाही होत्या." वाल्डमन यांनी सांगितलं की, डॅनियल आणि तिचा प्रियकर नोम शाई लवकरच लग्न करणार होते.