India vs Bangladesh : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) चांगली कामगिरी करताना दिसत आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यानंतर भारत गुणतालिकेत संघ पहिल्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला होता.


भारत विरुद्ध बांगलादेश


आता टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश संघाने 2007 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत केलं होतं. बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडिया ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती. यामुळे यंदा रोहित सेनेला सावध राहण्याची गरज आहे. तसेच बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.


IND vs BAN : हेड टू हेड आकडेवारी


एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ बांगलादेशवर वरचढ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात 40 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला, 2014 मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाही. टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे.


एकदिवसीय सामन्यात बांगलादेशची 'टफ फाईट'


मात्र, गेल्या काही काळापासून बांगलादेशच्या संघाने भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत 'टफ फाईट' दिली आहे. आशिया चषक 2023 च्या ग्रुप स्टेज सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. हा यंदाच्या वर्षी दोन्ही संघांमध्ये खेळलेला एकमेव एकदिवसीय सामना होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता.


वर्ल्ड कपमध्येही भारत पुढे


वनडे विश्वचषकाच्या इतिहासातही भारत बांगलादेशविरुद्ध आघाडीवर आहे. बांगलादेशने 2007 मध्ये त्यांच्या पहिल्या विश्वचषकात भारताचा पराभव केला होता, पण टीम इंडियाने शेवटचे तीन विश्वचषक सामने जिंकले आहेत. भारत 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी रोहित शर्माने झंझावाती शतक झळकावले होते आणि भारताने बांगलादेशचा 28 धावांनी विजय मिळवला होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात 4 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन तर बांगलादेशने एक सामना जिंकला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


World Cup 2023 : यंदाचा विश्वचषक 'हा' कर्णधार जिंकणार, ज्योतिषाची भविष्यवाणी; याआधीच्या तीन विश्वचषकाचं परफेक्ट भाकीत