Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा 12 वा दिवस, संघर्षात 4200 हून अधिक ठार

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Oct 2023 02:34 PM
Biden in Israel : बायडन पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार

US President Biden Israel Visit : इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांचं विमानतळावर मिठी मारून स्वागत केलं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

PM Modi on Gaza Hospital Attack : पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया

PM Modi Reaction on Gaza Hospital Attack : पंतप्रधान मोदी यांची गाझामधील रुग्णालयावर झालेल्या हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर एक्स पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'गाझा येथील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती मिळाली आणि मनाला धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबीयांना आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सध्या सुरू असलेल्या संघर्षात होणारी नागरिकांची जीवितहानी ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडू नका.'

Biden Isreel Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायलमध्ये दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये दाखल झाले आहे. बायडन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत युद्धाच्या परिस्थितीवर चर्चा करतील.

Israel Gaza War Live Updates : गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदतही थांबली

गाझामध्ये इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य आहे. लोकांचे जीवन नरकासारखे झाले आहे. येथील भीषण हल्ल्यांमुळे इजिप्तच्या सीमेवर जीवनावश्यक वस्तूंची मदतही थांबली आहे. परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.

Gaza Hospital Attack : इस्रायल आणि हमासचे एकमेकांवर आरोप

गाझामधील अल-अहली रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या कथित हवाई हल्ल्यात सुमारे 500 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुस्लिम देशांनी या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे, तर इस्रायलने या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचं म्हटलं आहे.

Israel Gaza Attack : इस्रायली सैन्याकडून गाझावर हल्ले

हमाससोबत सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायल सध्या कठोर पाऊल उचलताना दिसत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळेच इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करत आहे.

Isreal Hamas Attack : 1 लाखांहून अधिक पॅलेस्टिनींचं गाझामधून पलायन

इस्रायलच्या इशाऱ्यानंतर 1 लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी उत्तर गाझामधून दक्षिण गाझामध्ये पलायन केले आहे, तर 1 लाख लोक अजूनही येथे आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि मुलांना हातात घेऊन पायी दक्षिण गाझाला जात आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलने पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडून दक्षिण गाझाकडे जाण्याचा इशारा दिला होता. 

Israel Gaza Attack : इस्रायलचा रुग्णालयावर एअरस्ट्राईक, गाझामध्ये 500 ठार

इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने म्हटलं आहे की, 17 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेच्या सुमारास इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर हल्ला केली. या एअरस्ट्राईकमध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Hamas War Live Updates : लेबनीज सीमेवर इस्रायल लष्कराचे दोन जवान जखमी

मंगळवारी, इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की "लेबनीज सीमेवर इस्रायल लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक इस्रायली नागरिक देखील जखमी झाला. यासोबतच इस्रायलने लेबनॉनमधून सीमा ओलांडून आलेल्या 4 दहशतवाद्यांना ठार केले आहे." 

Israel-Hamas Attack : लेबनीज सीमेवरून उत्तर इस्रायलमध्ये हल्ले

इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे. लेबनीज सीमेवरून हमासला हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. इस्त्रायली सीमेवर हिजबुल्लाहकडून हल्लेही केले जात आहेत, ज्याला इस्रायली लष्कर प्रत्युत्तर देत आहे.

US President Israel Visit : बायडेन बुधवारी इस्रायलला पोहोचणार

भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसारख्या काही देशांनी युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. युद्धाच्या काळात अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री इस्रायलला भेट देऊन गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी बुधवारी (18 ऑक्टोबर) इस्रायलला भेट देणार आहेत.

Israel-Hamas War Death Toll : इस्रायल-हमास युद्धात 4700 हून अधिक जणांचा मृत्यू

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धात 4700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना अद्याप वाचवता आले नसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.