एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयसिसमध्ये भारतीय तरुणांची भरती करणारा मोहम्मद शफी ठार
सीरिया : आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतीय तरुणांची भरती करणारा मोहम्मद शफी अरमार याला ठार करण्यात आलं आहे. सीरियात अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात शफीचा खात्मा झाल्याचं कळतं.
26 वर्षीय मोहम्मद शफी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावचा रहिवासी आहे. भारतातील तरुणांनी आयसिसमध्ये भरती करण्याचं महत्त्वाचं काम शफीकडे होतं. त्याने सुमारे 30 तरुणांना आयसिसमध्ये भरती केल्याचं समजतं.
मोहम्मद शफी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या संपर्कात होता. फेसबुक ग्रुप आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याने 600 ते 700 तरुणांशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर तरुणांची भरती करण्यासाठी त्याने ऑनलाईन ट्रान्सफर आणि हवालामार्फत फंड जमा केला.
मोहम्मद शफी अरमारच्या मृत्यूमुळे आता भारतात आयसिस नेतृत्त्वहीन झालं असावं, असं सरकारी सुत्रांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement