मुंबई : 'एअर इंडिया'च्या विमानात अधिक मद्य नाकारल्याने धिंगाणा घालून क्रू मेंबरवर थुंकल्याबद्दल तुरुंगवासवास भोगलेली परदेशी महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. 50 वर्षीय आयरिश वकील सिमॉन बर्न्सने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाईटने सिमॉन मुंबईहून लंडनला जात होती. नऊ तासांच्या विमानात सिमॉनला अतिरिक्त मद्य देण्यास केबिन मेंबर्सनी नकार दिला. त्यामुळे संतापून तिने क्रूवर वर्णभेदी टिप्पणी केली होती. इतक्यावरच न थांबता तिने त्यांच्या थोंडावर थुंकण्याइतकं टोकाचं पाऊल गाठलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.
'मी तुमच्या माणसांसाठी काम करते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वकील. त्याच्या मोबदल्यात एक पैसाही घेत नाही. पण तुम्ही मला एक ग्लासभर वाईन देऊ शकत नाही. हे बरोबर आहे का?' असं सिमॉन बोलल्याचं वायरल व्हिडिओमध्ये ऐकू येत होतं.
एअर इंडियाने सिमॉनविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन सिमॉनला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोषी आढळल्यामुळे तिला एप्रिल 2019 मध्ये सहा महिन्यांचा कारावास सुनावला. तिची रवानगी यूकेमधील तुरुंगात झाली. परंतु 20 मे रोजी तिची सुटका झाली.
एक जुलै रोजी सिमॉन इंग्लंडमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सिमॉनचा मृत्यू संशयास्पद नसल्याचं सांगितलं आहे.
एअर इंडियाच्या क्रूवर थुंकल्याने तुरुंगवासवास भोगलेली महिला मृतावस्थेत आढळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 08:57 PM (IST)
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाईटने मुंबईहून लंडनला जाताना अतिरिक्त मद्य देण्यास नकार दिल्यामुळे आयरिश वकील सिमॉन बर्न्स क्रू मेंबरवर थुंकली होती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -