तेहरान (इराण) : इराणमध्ये एका प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात तब्बल 66 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणमधील हे विमान तेहरानहून यासूजला जात असताना अचानक रडारवरुन गायब झालं आणि त्यानंतर खाली कोसळलं.

तेहरान येथील मेहराबाद इंटरनॅशनल विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. यासूजला जाताना इस्फाहान प्रांताच्या सेमीरॉमजवळ या विमानाचा संपर्क रडारवरुन तुटला. या विमानात 60 प्रवाशांसह 6 क्रू मेंबरही होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, एटीआर 72 विमान उड्डाणानंतर 20 मिनिटातच रडारवरुन गायब झालं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, वैमानिकानं विमान लँण्ड करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी हे विमान खाली कोसळलं. खराब हवामानामुळे इथं तात्काळ हेलिकॉप्टरही मदतीसाठी पाठवता आलं नाही.