एक्स्प्लोर

Iran team FIFA : कोटावर 168 नंबरची पिन लावून अमेरिकेच्या सणसणीत चपराक, फिफा विश्वचषकासाठी मेक्सिकोत उतरलेल्या इराणच्या संघाने नेमकं काय केलं?

Iran team FIFA : संघाने कोणतेही भाषण न करता किंवा सार्वजनिक निदर्शने न करता शांतपणे ही श्रद्धांजली वाहिली.

मेक्सिको : 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी मेक्सिकोमध्ये दाखल झालेल्या इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने एका भावनिक कृतीमुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. संघातील खेळाडूंनी आपल्या कोटावर '168' हा अंक असलेले सोनेरी रंगाचे (Iran team wear 168 pins) बॅज परिधान केले होते. फेब्रुवारी महिन्यात इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही कृती करण्यात आली. 28 फेब्रुवारी रोजी मिनाब येथील प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचा  (Iran team wear 168 pins) मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 168 मुलांच्या स्मरणार्थ इराणच्या खेळाडूंनी '168' क्रमांकाचे बॅज लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. संघाने कोणतेही भाषण न करता किंवा सार्वजनिक निदर्शने न करता शांतपणे ही श्रद्धांजली वाहिली.(Iran team wear 168 pins in Mexico amid FIFA rules scrutiny)

मेक्सिकोतील तिजुआना विमानतळावर संघ पोहोचल्यानंतर खेळाडूंच्या या बॅजकडे माध्यमांचे आणि क्रीडारसिकांचे लक्ष गेले. विश्वचषकाच्या तयारीसाठी दाखल होत असतानाच इराण संघाने मानवी संवेदनांना प्राधान्य दिल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगली आहे. (Iran team wear 168 pins) 

Iran team wear 168 pins : '१६८' या आकड्यामागील विदारक सत्य

चालू वर्षात २८ फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब (Minab) येथील एका प्राथमिक शाळेवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या दुर्दैवी आणि अमानुष हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, ज्यामध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश होता. या लष्करी कारवाईत आणि दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांची संख्या १६८ इतकी होती. या मृत बालकांच्या स्मरणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इराणच्या संघाने आपल्या अधिकृत युनीफॉर्मवर हा आकडा परिधान केला आहे.

Iran team wear 168 pins : भाषण नाही, निदर्शने नाहीत; फक्त मूक आंदोलन!

मेक्सिकोमध्ये विमानातून खाली उतरताच खेळाडूंच्या या कृतीची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. खेळाडूंनी विमानतळावर किंवा प्रसारमाध्यमांसमोर कोणतेही राजकीय भाषण केले नाही की कोणतीही घोषणाबाजी केली नाही. कोणत्याही सार्वजनिक निदर्शनांऐवजी केवळ एका चिन्हाच्या (Symbolic Pin) माध्यमातून त्यांनी मृतांबद्दल आदर व्यक्त केला. यामुळे त्यांच्या विश्वचषकातील आगमनाला एका भावनिक स्मरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Iran team wear 168 pins : अमेरिका-इराण राजकीय तणावाची सावट

इराणच्या संघाचे हे पाऊल अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणलेले आहेत. यंदाच्या विश्वचषकातील इराणचे मुख्य सामने अमेरिकेत होणार आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील राजकीय वाद आणि व्हिसा प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे इराणच्या फुटबॉल संघाने अमेरिकेत न जाता शेजारील देश मेक्सिकोमध्ये आपला तळ ठोकला आहे. इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, इराणी खेळाडूंचे हे मूक आंदोलन जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रापलीकडे जाऊन राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget