एक्स्प्लोर

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर, काश्मीर विरोधात गरळ ओकली आहे. खोमेनी यांनी नमाज पठणा दरम्यान ग्लोबल इस्लामिक कम्युनिटीला काश्मीर, येमेन आणि बहारीनमधील निर्दोषांवरील होणारे हल्ले आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. AhlulBayt वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरानमधील ग्रेट मुसल्ला मैदानावरील नमाज पठणानंतर अयातुल्ला खोमेनी यांनी इराणच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी, ''काश्मीरसारख्या मुद्द्यावर मुस्लीम समाजातील बुद्धीजीवी वर्गानं आपला दृष्टीकोन स्पष्ट करावा,'' असं आवाहन केलं. खोमेनी यांनी पहिल्यांदाच काश्मीरप्रश्नी मत व्यक्त केलं असून, त्यांचं हे मत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अशावेळी काश्मीर विरोधात गरळ ओकली आहे, जेव्हा काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. खोमेनींनी काश्मीरप्रश्नी दोन ट्वीटही केले आहेत. यात त्यांनी काश्मीर प्रश्नी मत व्यक्त करताना मुस्लिम समाजाला आवाहन केलं आहे. खोमेनी यांच्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ''मुस्लिम समाजाने बहारीन, काश्मीर, येमेन आदी प्रश्नांवर जाहीर मतप्रदर्शन केलं पाहिजे. रमजानच्या काळात नागरिकांवर होणारे हल्ले आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे,''असं म्हटलं आहे. खोमेनीच्या दुसऱ्या ट्वीटमध्येही अशाच प्रकारचं आवाहन करण्यात आलं आहे. खोमींनीच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ''बहारीन, येमेन आणि इतर मुस्लीम देशांत होणाऱ्या हिंसाचारात इस्लामच्या शरिराला जखमा करत आहेत,'' अशी चिथवणी देणारी भाषा वापरली आहे. दरम्यान,  सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं फुटीरतवाद्यांच्या उपद्रवानं काल ईदच्या दिवशीही धुमसत होतं. श्रीनगरमधल्या ईदगाह, पुलवामा आणि अनंतनागमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काश्मीरचे तरुण पाकिस्तानचे झेंडे हातात घेऊन सैन्यावर दगडफेक करत होते. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी सैन्याकडून अश्रुधूरही सोडण्यात आली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यास उशीर लागला. पण या दगडफेकीत सैन्य दलासह अनेक नागरिक जखमी झाले होते. दुसरीकडे गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी इराणमधलं चाबहार बंदरासह अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीच मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी मोदींनी अयातुल्ला खोमेनी यांचीही भेट घेतली होती. यावेळी खोमेनी यांनी भारत-इराण संबंध अधिक मजबूत होण्यासाठी इराण प्रयत्नशील असेल, असं सांगितलं होतं. संबंधित बातम्या काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget