PM Modi On International Yoga Day : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी 21 जून रोजी जगभर साजरा केला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल सुद्धा भाष्य केलं. मुख्य म्हणजे यावेळची योग दिनाची थीम नेमकी कोणती असणार आहे हे त्यांनी घोषित केले. तसेच आंचरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहनही केलं. 






मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना (Theme) आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या."


तसेच पुढे पंतप्रधान म्हणाले की, "आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे. लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्याने आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे. कोरोना महामारीने आपल्या सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की, आपल्या जीवनात आरोग्याचे किती जास्त महत्व आहे आणि त्यात योगाचा किती महत्वाचा वाटा आहे. योगामुळे शारीरिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी कशी चालना मिळते, हे लोकांना कळते आहे. जगातील नामांकित व्यावसायिक व्यक्तींपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत, सर्वजण योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत."


महत्वाच्या बातम्या :