International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार 21 जूनला हा दिवस साजरा केला जातो. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.


दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. 


आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास :


27 सप्टेंबर 2014 रोजी UN जनरल असेंब्ली (UNGA) मधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.


आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम : 


नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात मोदींनी जागतिक योग दिनाची थीम जाहीर केली. त्यानुसार यावर्षीची थीम “मानवतेसाठी योग” अशी आहे.   


आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व : 



  • योग केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • योग तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो. 

  • योगासनांमुळे स्नायूंना बळ मिळते. 

  • नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. 

  • योगामुळे तणाव दूर होतो. चांगली झोप लाते.

  • योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. 



महत्वाच्या बातम्या :