Today in History Neil Armstrong Landed on Moon : आज जागतिक चंद्र दिवस आहे. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. आपल्या दैनंदिन जीवनात चंद्राला खूप महत्त्व आहे. दिवस ठरवण्यापासून, रात्री आपल्याला प्रकाश देण्यापर्यंत, चंद्रावर आपण अवलंबून आहोत. 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास रचला. म्हणून दरवर्षी या तारखेला राष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो. 54 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 20 जुलै 1969 नील आर्मस्ट्रांगने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं.
आजच्याच दिवशी 54 वर्षांपूर्वी मानवाची पहिली यशस्वी चंद्र मोहीम
चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्रांग यांच्या तोंडून निघालेले शब्द आजही इतिहासात सोनेरी पानावर लिहिलेले आहेत. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्रांग यांनी म्हटलं होतं की, "One small step for man, one giant leap for mankind."
चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाला?
नासाने चंद्राबाबत संशोधनालाठी अपोलो 11 मोहीम लाँच केली होती. ही मोहीम यशस्वी झाली आणि नील आर्मस्ट्रांगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. यावेळी त्यांच्या तोंडून निघालेला पहिला उद्गार खूप प्रसिद्ध आहे. यावेळी नील आर्मस्ट्रांग यांनी म्हटलं होतं की, One small step for man, one giant leap for mankind. याचा अर्थ असा की, 'माणसासाठी एक लहान पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी झेप.'
20 जुलैचा इतिहास
दरवर्षी 20 जुलै रोजी राष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य ठरले. त्या दिवसाची आठवण म्हणून जगभरात हा दिवस राष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो.
नासाची पहिली यशस्वी चंद्र मोहीम
20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास रचला, म्हणून दरवर्षी या तारखेला राष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो. 1960 च्या दशकात राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी जाहीर केले की, ते चंद्रावर मानव पाठवण्याची तयारी करत आहेत. त्या घोषणेनंतर आठ वर्षांनी, नासाने अपोलो 11 मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी झाली. या दिवशी, चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग यांनी बोललेले पहिले शब्द देखील खास आहेत.
नील आर्मस्ट्राँग यांची थोडक्यात ओळख
नील आर्मस्ट्रांग 200 पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवायचे. ड्रायव्हिंग परवान्यापूर्वी त्यांना वयाच्या 16 व्या वर्षी पायलटचा परवाना मिळाला होता. 1966 मध्ये जेमिनी-8 वर कमांड पायलटची भूमिका घेत नील आर्मस्ट्रांग अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचा (NASA) पहिला नागरी अंतराळवीर ठरला होता. आर्मस्ट्राँग यांनी 1971 मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा सोडली. मग त्यांनी विद्यार्थ्यांना अंतराळ अभियांत्रिकीविषयी शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची हृदयरोगाशी झुंज सुरु होती. त्यांचं ऑपरेशन झालं. मात्र, त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली. 25 ऑगस्ट 2012 रोजी नील आर्मस्ट्रांग यांचं निधन झालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :