मुंबई : आंतराष्ट्रीय महिला दिवसाप्रमाणेच आंतराष्ट्रीय पुरुष दिवसही साजरा करण्यात येतो. दरम्यान, ज्या उत्साहात महिला दिवस साजरा केला जातो. तो उत्साह मात्र पुरूष दिवस साजरा करताना पाहायला मिळत नाही. 19 नोव्हेंबर रोजी 80 देशांमध्ये आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी आंतराष्ट्रीय पुरुष दिवसाची थीम 'मेकिंग अ डिफरेंस फॉर मेन अॅन्ड बॉइज' अशी आहे. आंतराष्ट्रीय पुरुष दिवस, 19 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. याची सुरुवात 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ओस्टर द्वारे करण्यात आली होती.

आंतराष्ट्रीय पुरुष दिवसाचा इतिहास

1923मध्ये अनेक पुरुषांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. यासाठी पुरुषांनी आंदोलनही केलं होतं. त्यावेळी पुरुषांनी 23 फेब्रुवारीला आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी केली होती. यानंतर 1968मध्ये अमेरिकन जर्नलिस्ट जॉन पी. हॅरिस यांनी एक आर्टिकल लिहिलं त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, सोव्हिएत प्रणाली महिलांसाठी आंतराष्ट्रीय दिवस साजरा करते, परंतु पुरुषांसाठी मात्र ते असा कोणत्याच प्रकारचा दिवस साजरा करत नाहीत. त्यानंतर 19 नोव्हेंबर 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅको मधील लोकांनी पहिल्यांदा आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला.

भारतात 2007मध्ये पहिल्यांदा आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला. यानंतर भारतात दरवर्षी 19 नोव्हेंबर आंतराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात जातो.

आंतराष्ट्रीय पुरुष दिवसाचं महत्त्व

आंतराष्ट्रीय पुरुष दिवस मुख्यकरून पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष देणं, लैंगिक समानतेसाठी आणि पुरुष रोल मॉडल्सचे महत्त्व वाढविण्यासाठी साजरा करण्यात येतो. InternationalMensDay च्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जगभरामध्ये महिलांपेक्षा जास्त पुरुष आत्महत्या करतात. तसेच प्रत्येक 3पैकी एक पुरुष घरगुती हिंसेचा शिकार होतो.