Canada : तुम्ही असे अनेक व्यक्ती पाहिले असतील ज्यांनी दुसरं लग्न केलं. पण कॅनडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं सर्व रेकॉर्ड्स मोडून तब्बल 27 लग्न केली आहेत. कॅनडामधील (Canada) विंस्टन ब्लॅकमोर (Winston Blackmore) यानं एकूण 27 लग्न केली आहेत. तसेच त्यांना 150 मुलं देखील आहेत. विंस्टन ब्लॅकमोर यांना बहुपत्नीत्व (Polygamy) देखील म्हणले जाते. त्यांच्या मुलीनं सांगितलं की, एकाच घरात इतके लोक राहतात ही एक अतिशय खास गोष्ट आहे.


द सन यांच्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये  राहणारे विंस्टन ब्लॅकमोर हे 65 वर्षाचे आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीचे नाव मेरी जेन ब्लॅकमोर असं आहे.  विंस्टन ब्लॅकमोर यांच्या मुलीनं सांगितलं की, बालपणापासून ती भावंडांसोबत राहात होती. जेव्हा ती 15 वर्षाची होती तेव्हा तिच्या वडीलांचे 12 वे लग्न झाले होते. तेव्हा तिला 40 भावंड होते. पण त्यानंतर विंस्टन यांना 110 मुलं झाली. 


विंस्टन ब्लॅकमोर यांनी वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश कोलंबिया येथे पहिल्या पत्नीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांची पहिली पत्नी प्रेग्नंट होती तेव्हा विंस्टन यांनी क्रिस्टीना नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. त्यानंतर मेरी एनसोबत त्यांनी तिसरं लग्न केलं. 


विंस्टन ब्लॅकमोर यांचे नियम 
विंस्टन ब्लॅकमोर यांच्या कुटुंबात राहणाऱ्या महिलांसाठी विंस्टन यांनी काही नियम तयार केले आहेत. या कुटुंबातील महिलांना मेक-अप करणे आणि हेअर कट करणे या गोष्टींना बंदी आहे. तसेच त्यांच्या घरात टिव्ही पाहणे , गाण लावणे हे करण्यास देखील बंदी आहे. विंस्टन यांच्या मुलीनं 2017 मध्ये वडीलांवर  बहुविवाहाचा आरोप केला होता. त्यानंतर 2018 मध्ये दोषी ठरल्यानंतर विंस्टन यांना  सहा महिने नजरकैदेत ठेवण्यात आले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल; युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती वाईट


अनोखी भेट! पत्नीच्या वाढदिवशी पतीकडून चक्क ATM मशीन गिफ्ट, नागरिक आश्चर्यचकित


Russia Ukraine Crisis : युद्धाला जाण्याआधी वडिलांनी घेतली मुलीची भेट, भेटीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha