Pakistan Punjab Assembly: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बहुमत गमावल्यानंतर त्यांचा पक्ष असलेल्या पीटीआयचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेच्या उपसभापतींवर पीटीआयच्या नेत्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात उपसभापती दोस्त मोहम्मद माजरी जखमी झाले आहेत. सध्या त्यांना झालेल्या दुखापतींबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पीटीआयच्या आमदारांनी दोस्त मोहम्मद माजरी यांना कानशिलात लगावत केस ओढल्याच सांगणायत येत आहे. हा सर्व गदारोळ सुरु असताना उपस्थित सुरक्षा रक्षकांनी  त्यांना सुरक्षित सभागृहाच्या बाहेर काढले. 


पंजाबचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी उपसभापती दोस्त मोहम्मद मजारी सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आले असता इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या आमदारांनी त्यांना मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीटीआयच्या आमदारांनी त्यांच्यावर हातात मिळेल ती वस्तू फेकण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षकही तेथे उपस्थित होते. पंजाब विधानसभेचे अधिवेशन सकाळी 11.30 वाजता सुरू होणार होते, परंतु पीटीआय सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे ते तहकूब करण्यात आले.






लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंजाबमध्ये नवीन मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक घेण्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आले होते. ही निवड हमजा शाहबाज आणि चौधरी परवेझ इलाही यांच्यातून होणार होती. या अधिवेशनात नवा मुख्यमंत्री निवडला जाणार होता, त्याचे अध्यक्षस्थान दोस्त मोहम्मद माजरी होते. हमजा शाहबाज आणि परवेझ इलाही यांच्यात चुरशीची लढत होईल, असे मानले जात होते. हमजा हे पीएमएल-एन आणि इतर पक्षांचे उमेदवार आहे. तर इम्रान यांचा पक्ष पीटीआय पीएमएल-क्यूच्या इलाही यांना पाठिंबा आहे.


शनिवारचे सत्र लाहोर उच्च न्यायालयाच्या बुधवारच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी लवकर निवडणुका आणि उपसभापतीचे अधिकार बहाल करण्याची हमजा यांची याचिका फेटाळून लावली होती. गेल्या आठवड्यात उपसभापतींचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यांना न्यायालयाने 16 एप्रिलला निवडणूक घेण्यास सांगितले होते.