Ukraine-Russia Conflicts : यूक्रेन-रशियात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या वादात भारताची मात्र अडचण झाल्याचं दिसतंय. एकीकडे भारताचा जुना मित्र रशिया आहे तर दुसरीकडे अमेरीका. अशातच हा तणाव कमी व्हावा यासाठी फ्रान्सकडून काल पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर अमेरीकेनं देखील यावर भाष्य करताना आम्ही चर्चेस सकारात्मक असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, एकूणच यूक्रेन-रशिया यांच्या सुरु असलेल्या वादात भारताची अडचण झाली आहे. वाचा याच संदर्भातील एक रिपोर्ट… 


भारतासाठी चिंतेचा विषय


जगभरासाठी रशिया आणि यूक्रेनमधील तणाव चिंतेचा विषय झालाय. रशिया आणि यूक्रेनमधल्या वादाचा सर्वाधिक फटका युरोपीय देशांना बसणार आहे. कारण युरोपीयन देशांना सर्वाधिककच्च्या तेलाची आयात ही रशियातून होते. अशातच या देशांना युद्ध नकोय. त्यासाठी फ्रान्सकडून पुतीन यांच्याशी बातचीत करत वाढणारा संघर्ष थांबवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या तणावाच्या वातावरणात काल फ्रान्सनं रशियाशी बोलणी केली आणि मध्यस्थीसाठी प्रयत्न केलेत. अमेरिकेकडून रशियासोबत बैठकीस तत्वत: सहमती दर्शवली आहे. मात्र, एकूणच यूक्रेन आणि रशियामधील वाद भारतासाठी चिंतेचा विषय ठरलाय. एकीकडे जुना मित्र आहे तर दुसरीकडे महासत्ता. रशियानं भारताला लष्करी सामर्थ्यवान बनवण्यात मोठी मदत केलीय. अशातच जर यूक्रेनवर रशियानं हल्ला केला तर अमेरीका देखील या युद्धात पडेल. आणि त्याचा परिणाम म्हणून रशियावर अमेरीका काही निर्बंध लादू शकते. तसे झाल्यास कच्च्या तेलाचे भाव वधारतील आणि अनेक देशांच्या अडचणीत वाढ होईल आणि यातील एक भारत देखील असेल. यूक्रेनमधून देखील भारत सूर्यफूल तेल आयात करतो, अशात त्याचा देखील फटका बसू शकतो. 


पुतीन यांच्याशी भेटण्यास बायडेन यांची तत्वत: सहमती


पुतीन आणि बायडेनमध्ये झालेली पहिली बैठक निष्फळ ठरली असली तरी पुन्हा एकदा फ्रान्सच्या मध्यस्थीने डिप्लोमसीतून मार्ग निघावा फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राॅन यांनी प्रयत्न केले आहे. यावर अमेरीकेकडून देखील जोपर्यंत रशिया यूक्रेनवर हल्ला टाळेल तोपर्यंत पुतीन यांच्याशी भेटण्यास बायडेन यांनी तत्वत: सहमती दर्शवल्याचं कळतं. आणि अशातच अमेरीका आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक ह्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसे संकेत देखील दोन्ही बाजूने देण्यात येत आहे. मॅक्रॉनकडून देखील बैठकीतयुरोपमधील सुरक्षा आणि धोरणात्मक स्थिरतेवर चर्चा होईल असं सांगण्यात आलंय.


एकीकडे भारताचा जुना मित्र रशिया तर दुसरीकडे अमेरीका
 रशियानं अजूनही युद्ध अभ्यास सुरुच ठेवलाय. यूक्रेन हा लवकरच नाटो सदस्यांच्या यादीत सहभागी होणार असल्याचंबोललं जातंय.आणि त्यामुळेच रशियानं नाटोमुळे आपली राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात येत असल्याचं म्हंटलंय. यूक्रेन आणि रशियाच्या वादात भारताची अडचण झाल्याचं दिसतंय. एकीकडे भारताचा जुना मित्र रशिया आहे तर दुसरीकडे अमेरीका. त्यामुळे ह्या संघर्षात भारतानं शांत राहणंच पसंत केलंय. दुसरीकडे, जर या दोघांमध्ये युद्ध झाले तर तेलाच्या भावातही मोठीवाढ दिसू शकेल. आणि ती आपल्यासाठी अडचणी ठरु शकते. दुसरीकडे, नाटो देशांच्या आडून अमेरीकेचे जगावरील वर्चस्व कमी करण्यासाठी रशिया संघर्ष कमी करण्यासाठी अमेरीकेकडे काय मागणी करेल हे बघणं महत्त्वाचे असेल. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha