Sri Lanka India : श्रीलंकेत (Sri Lanka) चीनचं (China) हेरगिरी जहाज पोहोचण्याच्या एक दिवस आधी भारतीय नौदलानं (Indian Navy) श्रीलंकेच्या लष्कराला (Sri Lanka Army) डॉर्नियर सागरी गस्ती विमान (Dornier Aircraft) देऊन मोठा डाव साधला आहे. भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) तयार केलेली डॉर्नियर 228 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट (MPA) श्रीलंकेला भारताकडून देण्यात आली आहेत. चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदरात येण्यापूर्वी भारतानं उचललेलं हे पाऊल चीनचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
भारतीय नौदलाच्या वाइस चीफनी ( Vice Chief) राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत कोलंबोमध्ये हे टोही विमान श्रीलंकन लष्कराच्या ताब्यात दिलं. कोलंबो येथे झालेल्या लष्करी समारंभात श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि भारतीय नौदलाचे सह-प्रमुख व्हाईस अॅडमिरल एसएन घोरपडे यांच्यासह श्रीलंकेचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, श्रीलंकेचे संरक्षण सचिव आणि श्रीलंकेतील भारतीय हाय कमिश्नर गोपाल बागले हेही उपस्थित होते.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं राजधानी दिल्लीत सांगितलं की, हे डॉर्नियर विमान श्रीलंकेला सागर-नीती म्हणजेच, 'सिक्योरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन'साठी देण्यात आलं आहे. हे टोही विमान श्रीलंकेच्या सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करेल. डॉर्नियर विमान भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरेल. दरम्यान, श्रीलंकेनं यासंदर्भात भारताशी प्रदीर्घ वाटाघाटी केल्या असून त्यानुसार भारताकडून दोन विमानं श्रीलंकेच्या हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
भारताचं चीनला उत्तर?
भारतीय नौदलाचे वाईस चीफ, व्हाईस अॅडमिरल घोरपडे यांनी डॉर्नियर विमान श्रीलंकेला भेट म्हणून देणं हा मोठा डाव मानला जात आहे. कारण मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी चिनचं हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेच्या सागरी सीमांमध्ये पोहोचणार आहे. चीनचे युआन वांग जहाज श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात आज पोहोचणार आहे. चिनकडून असं सांगण्यात येतं की, हे जहाज संशोधन आणि सर्वेक्षण करणारं जहाज आहे आणि इंधन भरण्यासाठी हंबनटोटा येथे पोहोचत आहे. पण चीन याचा वापर हेरगिरीसाठी करत असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात बॅलिस्टिक आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग जहाज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :