Egyptian Church Fire: जिप्तमध्ये चर्चला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती देताना इजिप्तमधील कॉप्टिक चर्चने सांगितले की, Cairo येथील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जखमी झाले आहेत. चर्चने आरोग्य अधिकार्‍यांचा हवाला देत मृतांचा आकडा जाहीर केला आहे. चर्चने म्हटले आहे की, इम्बाबा येथील सेफीन चर्चला आग लागली.


आग लागल्याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी चर्चमध्ये बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.






राष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त 


इजिप्तच्या राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावाड्रोस II यांच्याशी फोनवर संवाद साधत शोक व्यक्त केला. अल-सिसी यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, "मी या दुःखद अपघाताच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मी सर्व संबंधित संस्थांना सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अपघात आणि त्याचे परिणाम त्वरित हाताळावेत."


दरम्यान, इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षांतील ही सर्वात भीषण आगीची घटना आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये काहिराजवळील एका कपड्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत किमान 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर 24 जण जखमी झाले होते. आग लागल्यानंतर घटनास्थळी धुराचे लोट दिसत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Salman Rushdie : सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोप
Johnson and Johnson Baby : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पॉवडरची विक्री बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय, कारण काय?
Plane Landing Video : पाहता-पाहता अगदी डोक्यावरून गेलं विमान, प्लेन लँडिंगचा भन्नाट व्हिडीओ, एकदा नक्की पाहा