Maldives : मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू (Mohamed Muizzu) यांनी भारताला आपले लष्कर मागे घ्यायला लावल्यानंतर चीनने त्या देशावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. मालदीवमध्ये चीन आता मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असून मालदीवही त्यांना त्यासाठी मोठी संधी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


हाँगकाँगस्थित इंग्रजी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वेबसाईटवर या मथळ्यासह एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे की, मालदीवला आपल्या नवीन चिनी मित्र राष्ट्रपतींसोबत गुंतवणुकीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. कारण बीजिंगला संधीचा फायदा घ्यायचा आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य हटवण्यासाठी मालदीव चीनकडून काय घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मालदीव चीनकडून काय घेणार?


मोहम्मद मुईज्जू हे चीन समर्थक नेते म्हणून  प्रसिद्ध आहेत. या आठवड्यात चीनच्या विशेष दूताने त्यांची भेट घेतल्यानंतर मालदीव चीनकडून ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि पर्यटन सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीची अपेक्षा करत आहे असे साउथ चायना मॉर्निंग पोस्टने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे. 


मालदीव या क्षेत्रात चिनी गुंतवणूकदारांना संधी देण्याची शक्यता


नूतनीकरणक्षम ऊर्जा मालदीवच्या गुंतवणुकीच्या अजेंड्यावर उच्च असेल कारण ते कमी प्रदूषण लक्ष्यांकडे जाते आणि ते पर्यटनाचे आकर्षण केंद्र आहे. अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये आणखी सहकार्याला वाव आहे. कारण मालदीवचे 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट आहे. अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानातील चीनचे कौशल्य मालदीवमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात योगदान देऊ शकते.


मालदीव चिनी गुंतवणूकदारांना हॉटेल आणि रिसॉर्ट डेव्हलपमेंट, वॉटर स्पोर्ट्स, इको-टूरिझम आणि ट्रॅव्हल एजन्सीमध्ये अधिक संधी देण्याची शक्यता आहे. मत्स्यव्यवसाय, कृषी, रिअल इस्टेट, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स ही क्षेत्रेही परदेशी गुंतवणुकीसाठी खुली असल्याचे त्यांनी सांगितले. चीनी सीमाशुल्क डेटानुसार, 2020 ते 2022 पर्यंत मालदीवमध्ये चीनची निर्यात 59 टक्क्यांनी वाढली आहे. 


भारताने मालदीवमधून लष्कर मागे घ्यावं


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने मालदीवमधून आपलं लष्कर मागे घ्यावं. 


मालदीवचे नवीन राष्ट्रपती चिनी समर्थक


मुईझू यांनी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) शपथ घेतल्यानंतर म्हटले की, मालदीवच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी देशात कोणतेही परदेशी सैन्य अस्तित्वात नाही याची खात्री करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. चीन समर्थक समजले जाणारे मुईझू हे मालदीवचे आठवे राष्ट्राध्यक्ष आहेत.


ही बातमी वाचा: