India vs Australia 2023 World Cup Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी नाणेफेक झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची होती, कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली दिसते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, त्याला प्रथम गोलंदाजी करायची आहे आणि रात्री येणारे दव हे यामागचे एक कारण आहे. 


वर्ल्डकपच्या फायनलचा असाही इतिहास! 


वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकप 1983 मध्ये जिंकला तेव्हा सुद्धा कॅप्टन कपिल देव टाॅस हरले होते, पण वर्ल्डकप खेचून आणला होता. त्यानंतर असाच योगायोग 2011 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घडला होता. त्यामुळे 2023 चा टीम इंडियाचा धमाका पाहता वर्ल्डकप फक्त एक क्षण दूर आहे अस म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 






कोणत्याही संघाने कोणतेही बदल केले नाहीत


भारताचे प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलियाचे प्लेईंग इलेव्हन


डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.


प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव 


या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक साखळी सामनाही खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना केवळ 199 धावांत गुंडाळले. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीच्या काळात आपल्या गोलंदाजीने भारताला अडचणीत आणले. त्या सामन्यात भारताने अवघ्या 2 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत शानदार भागीदारी करत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यामागे हे देखील एक कारण असावे. मात्र, दोन्ही कर्णधारांनी या मैदानाची खेळपट्टी कोरडी असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया किती धावा काढते आणि नंतर दव पडल्यानंतरही भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रोखू शकतील की नाही हे पाहावे लागेल.


इतर महत्वाच्या बातम्या