अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट नेदरलँडला रवाना झाले. पंतप्रधान मोदींचं नेदरलँडमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. जवळपास 13 वर्षांनी भारताचे पंतप्रधान नेदरलँड दौऱ्यावर आहेत. यापूर्वी 2004 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह नेदरलँड दौऱ्यावर गेले होते.
नेदरलँडमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
भारत आणि नेदरलँडचे संबंध 70 वर्षांपेक्षा कायम आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे यापुढेही संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आज सर्व जग इंटरकनेक्टेड आहे. त्यामुळे या भेटीत आम्ही केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नाही, तर अनेक जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करु, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी चर्चेअगोदर बोलताना दिली.
नेदरलँडचे पंतप्रधान काय म्हणाले?
भारत आणि नेदरलँड आज अनेक क्षेत्रांमध्ये एकत्रपणे काम करत आहे. यापुढेही असंच काम करत राहू. राजनैतिक आणि आर्थिक अशा दोन्ही विकासाचं आम्ही स्वागत करतो, असं नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी सांगितलं.
भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर आहे. गेल्या 70 वर्षांप्रमाणेच यापुढेही एकत्र काम करत राहू, अशी अपेक्षा मार्क रुटे यांनी व्यक्त केली.