वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी भेट घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलं होतं. यावेळी घडलेला एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानियासोबत व्हाईट हाऊसबाहेर नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उभे होते. मोदींची गाडी थांबताच गार्डनी डाव्या बाजूने गाडीचं दार उघडलं आणि सॅल्युट ठोकला. त्याचवेळी दुसरा गार्ड उजव्या बाजूचं दार उघडण्यासाठी गेला. मोदी गाडीत एकटेच असल्याने दुसऱ्या बाजूचं दार कोणासाठी उघडलं गेलं, हा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनेकांच्या तर्कवितर्कांना उधाण आलं. मोदींसोबत त्यांची पत्नी असेल, या आशेने गार्ड्सनी दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला, अशी चर्चा रंगली होती.

https://twitter.com/GabbbarSingh/status/879434009511575552

अमेरिकन प्रोटोकॉलची शक्यता

दोन्ही बाजूचे दरवाजे उघडणं हा अमेरिकेतील प्रोटोकॉल असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मोदी व्हाईट हाऊसहून परत जात असतानाही कारच्या दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्यात आले होते आणि सॅल्यूट करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :


मोदी-ट्रम्प भेटीतील महत्त्वाचे 5 मुद्दे !


मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...


नरेंद्र मोदी हे एक महान पंतप्रधान आहेत: डोनाल्ड ट्रम्प


अमेरिकेत सात मुस्लीमबहूल देशातील नागरिकांना 'नो एंट्री' कायम


‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान मोदी