Watch Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे चक्क बुलेटफ्रूफ हेल्मेट घालून आज कोर्टात हजर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही बुलेटफ्रूफ हेल्मेटने त्यांना  कव्हर केल्याचं दिसून येतय. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे पाकिस्तानची परिस्थिती कितपत ढासळली आहे याचा अंदाज येतोय. 


दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोर न्यायालयाने तीन खटल्यांमध्ये दिलासा दिला आहे. इम्रान खान यांच्याविरोधात दहशतवादी विरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या संदर्भात सुनावणी करताना इम्रान खान यांना जामीन देण्यात आला आहे.


 






इम्रान खानच्या काळ्या बुलेटप्रूफ हेल्मेटशी संबंधित व्हिडिओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी काही यूजर्सनी शाहरुखच्या पठाण या चित्रपटाची आठवण काढत कमेंट केली आहे. बॉलिवूडमधील पठाण बंदुका आणि बॉम्बने खेळतात आणि पाकिस्तानचे पठाण बुलेटप्रूफ बुरख्यात कोर्टात हजर होतात. 


 






हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीजणांनी म्हटलंय की, माजी पंतप्रधानाला जर असं कोर्टात हजर राहावं लागत असेल तर त्या देशातील परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना येते. तर एका यूजरने लिहिलं आहे की, हे बुलेटफ्रूफ हेल्मेट वापरून इम्रान खान किती भित्रा आहे हे स्पष्ट होतंय. 


इम्रान खानचा अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवला


पाकिस्तानच्या लाहोर येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने मंगळवारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या अंतरिम जामिनाला 13 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.