Imran Khan: पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांनी आपली पुढील रणनीती स्पष्ट केली आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला, परंतु सत्ता बदलण्याच्या परकीय षड्यंत्राच्या विरोधात आज स्वातंत्र्य लढा पुन्हा सुरू झाला आहे. देशातील जनता नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे रक्षण करते.


इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आणि इस्लामाबादमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे हे पहिलेच ट्वीट आहे. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी देशाला संबोधित करताना रविवारी जनतेला रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे आवाहन केले होते.


राजकीय गदारोळात पाकिस्तानात (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांनी इस्लामाबाद (Islamabad) सोडले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा नॅशनल असेंबलीतील अविश्वास प्रस्तावावरील मतदानात पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी इस्लामाबादमधील पंतप्रधान निवासस्थान सोडल्यानंतर हेलिकॉप्टरने इस्लामाबादला रवाना झाले. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 1992 मध्ये आपल्या कमकुवत संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात यश मिळवले होते. मात्र हीच कामगिरी राजकीय खेळपट्टीवर दाखवण्यात त्यांना अपयश आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha