Corona in China : चीनच्या शांघाय शहरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. शांघायमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. शनिवारी शहरात 23 हजार 600 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने वाणिज्य दूतावासातील अत्यावश्यक सेवेत नसणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दूतावास सोडण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, शांघायच्या उप-महापौरांनी शहराच्या कोरोना संसर्गाच्या उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यात कमतरता राहिल्याचं मान्य केलं. 


उपमहापौर झोंग मिंग यांनी कठोर निर्बंधांवर सार्वजनिक टीका करूनही जनतेच्या पाठिंब्याचे आणि फ्रंट-लाइन कामगारांच्या कार्याचे कौतुक केले, परंतु विषाणूचा उद्रेकाची परिस्थिती हाताळणी सुधारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, 'आम्ही केलेली कामं पुरेशी ठरली नाहीत. अजूनही नागरिकांच्या अपेक्षा आणि आमचं काम यामध्ये खूप अंतर आहे. आम्ही सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.' 


शांघाय शहरात अन्नधान्याची टंचाई
शांघाय शहरातील रहिवासी कुरियरच्या कमतरतेमुळे आणि लॉकडाऊन कधी संपेल याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे अन्नाची कमतरता निर्माण झाली आहे. उपमहापौरांनी अन्न पुरवठा वितरणातील समस्या मान्य केल्या आहेत. त्यांनी सुपरमार्केट आणि फार्मसीने शक्य तितके ऑनलाइन काम करणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. सुमारे 26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघायमध्ये अनेक दिवस लोकांना लॉकडाऊनसह कोरोना निर्बंधांचे पालन करावं लागत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha