गिफ्ट मागितलं आणि घटस्फोट दिला, रेहम खानचा खुलासा

नवी दिल्ली : लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आणि इम्रान खानने मला घटस्फोट दिला असा दावा, पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि तहरिक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या पत्नीने केला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेहमने हा गौप्यस्फोट केला आहे. इम्रानने माझ्यासोबत जे केलं ते पाकिस्तानसोबत करु नये म्हणजे झालं, अशा शब्दात रेहमने टोला लगावला.
महिला पत्रकार रेहम खान हिच्याशी 62 वर्षीय इम्रान खान यांनी लग्नानंतर 10 महिन्यातच घटस्फोट घेतला. दोघांच्या घटस्फोटाची अनेक कारणं समोर आली. मात्र आता खुद्द रेहमनेच त्याचा खुलासा केला आहे.
इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये तहरिक-ए-इन्साफ पार्टीची स्थापना केली. इम्रान खान यांच्या पक्षाने 2 नोव्हेंबरला इस्लामाबाद बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्याआधी रेहमने इम्रान खानबाबत मोठा खुलासा केला.
Before You Go
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका






















