एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
चंद्रावर बर्फ, इस्रोच्या दाव्याला नासाचा दुजोरा
चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चंद्र मोहिमांमध्ये, तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
नवी दिल्ली : इस्रोच्या ‘चंद्रयान-1’ मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याच्या संशोधनाला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दुजोरा दिला आहे.
चंद्राच्या काही भागात पाणी असल्याच्या दाव्याला ‘नासा’ने पुष्टी दिली आहे. इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या ‘चंद्रयान-1’ या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रुपात पाणी गोठलेले असल्याची माहिती दिली होती. या माहितीला आता नासानेही दुजोरा दिला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चंद्र मोहिमांमध्ये, तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
‘पीएनएस’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ आढळलंय. मात्र ते एकाच ठिकाणी नसून, सर्वत्र विखुरलं आहे. दक्षिण ध्रुवावरील ल्युनर क्रेटर्सजवळ बर्फ गोळा झालंय. चंद्रावर बर्फ असल्याचे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी मिनरेलॉजी मॅपरच्या (M3) आकड्यांचा आधार घेतला आहे.
नासाच माहिती :
In the darkest and coldest parts of the Moon's poles, ice deposits have been found. At the southern pole, most of the ice is concentrated at lunar craters, while the northern pole’s ice is more widely, but sparsely spread. More on this @NASAMoon discovery: https://t.co/kvjPbMrEWK pic.twitter.com/ZkVFyKrOB6
— NASA (@NASA) August 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement