एक्स्प्लोर

माय नेम इज अँथनी फर्नांडिस, गँगस्टर रवी पुजारीचा सेनेगल सरकारसमोर दावा, प्रत्यार्पण लांबणार

आपण बुर्किना फासोचे (पश्चिम आफ्रिकन देश) रहिवासी असल्याचा दावा पुजारीच्या वतीने सेनेगल कोर्टासमोर करण्यात आला आहे. पुजारीच्या वकिलाने तसा पासपोर्ट सादर केला आहे. रवी पुजारीने आपली ओळख लपवल्याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या कारवाईला उशीर होऊ शकतो.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने आपण अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. सेनेगल सरकारकडे केलेल्या अपीलामुळे पुजारीच्या प्रत्यार्पणात दिरंगाई होऊ शकते. काही दिवसांपूर्वी आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. आपण बुर्किना फासोचे (पश्चिम आफ्रिकन देश) रहिवासी असल्याचा दावा पुजारीच्या वतीने सेनेगल कोर्टासमोर करण्यात आला आहे. पुजारीच्या वकिलाने तसा पासपोर्ट सादर केला आहे. रवी पुजारीने आपली ओळख लपवल्याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या कारवाईला उशीर होऊ शकतो. रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक केल्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणा रवी पुजारीवर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवून होती. परराष्ट्र मंत्रालय सेनेगलमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. रवी पुजारी गँगच्या गुन्ह्यांची माहिती, इंटरपोलने बजावलेल्या 13 रेड कॉर्नर नोटिसा, मुंबई आणि कर्नाटक पोलिसांनी प्रत्यापर्णासंदर्भात पाठवलेली पत्रं आणि पुजारीच्या खोट्या पासपोर्टविषयी माहिती देणारी कागदपत्रं सेनेगल सरकारसमोर सादर केली आहेत. पुजारीच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने तातडीने गोळा करुन प्राधान्याने सेनेगल सरकारला पाठवण्याचे आदेश मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या बहिणी जयलक्ष्मी सलियन आणि नयना पुजारी यांच्या डीएनए टेस्ट होण्याची शक्यता आहे. पुरावे जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यार्पण लांबण्याची भीती आहे. भारतीय यंत्रणा मात्र पुजारी तडिपार व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. तडिपारीच्या प्रक्रियेमध्ये एखादा देश अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकाला देशातून बाहेर हाकलून देतो, तर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेमध्ये संबंधित देशातील सरकार दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेते. कोण आहे रवी पुजारी ? रवी पुजारी हा 90च्या दशकात मुंबईत सक्रिय होता. तो कुख्यात डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. मात्र 2001 साली तो छोटा राजनच्या गँगमधून बाहेर पडला. मुंबईतील गँग्ज विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर त्यांने मुंबईतून पलायन केलं होतं. त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याने नुकतंच जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्यावर बॉलिवूड सेलिब्रेटींकडून खंडणी मागिल्याचाही आरोप आहे. तो मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये असल्याची माहिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget