Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असेल्या युद्धाचा (RUSSIA UKRAINE CONFLICT) परिणाम यूएसच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. फेडरल रिझर्व्हच्या धोरणकर्त्यांनी गुरुवारी याबाबतचे संकेत दिले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा यूएसच्या अर्थव्यवस्थेवर विविध मार्गांनी परिणाम होऊ शकतो. यामध्ये इंधन दरवाढीसह इतर घरगुती वस्तूंचेही दर वाढू शकतात.
यूएसमध्ये आधीच महागाईचा भडका वाढला आहे. त्यातच आता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर गुरुवारी तेलाच्या किमतींममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे तर 105 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. याबरोबरच यूएसमध्ये ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. यूएसमध्ये आधीच महागाईचा भडका सूरू आहे. त्यातच आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई आणखी वाढू शकते.
तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर राहिल्या तर यूएसमध्ये घरात वापर होणारी ऊर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरी 750 डॉलरने वाढू शकते. या दरवाढीमुळे तेथील नागरिकांकडे इतर वस्तू आणि सेवांवर खर्च करण्यासाठी कमी पैसे राहतील, असे EY-Parthenon चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ग्रेगरी डॅको यांनी सांगितले. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे या वर्षी महागाई 0.6 टक्क्यांनी वाढू शकते, अशी माहिती डॅको यांनी दिली.
"यूएसमधील कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या उत्पन्नातील मोठी रक्कम गॅसोलीनकडे जाते. त्यामुळे महागाई वाढली तर ग्राहकांचा खर्च कमी होतो. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, " अशी माहिती रिचमंड फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष थॉमस बार्किन यांनी दिली. असे असले तरी रशिया आणि युक्रेन दोघांची यूएसमधील आयात आणि निर्यात फक्त 1 टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन संघर्षाचा यूएसच्या व्यापाराला जास्त मोठा फटका बसणार नाही. यूएस हा युरोपियन मित्र राष्ट्रांना नैसर्गिक वायूची निर्यात करतो. त्यामुळे नैसर्गित वायूंच्या किंमती मर्यादित केल्या पाहिजेत, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे.
कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी ठप्प आहे. त्यामुळे वाहनांपासून अन्नापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आता रशिया-युक्रेनच्या संघर्षामुळे या महागाईत आणखी वाढ होऊ शकते. रशिया आणि युक्रेन हे जगातील एक चतुर्थांश गव्हाची निर्यात करतात. शिवाय युक्रेन हा जगातील प्रमुख कॉर्न निर्यात करणारा देश आहे. पुढील काही महिन्यांत विकसित अर्थव्यवस्थांमध्ये 0.2 ते 0.4 टक्क्यांच्या दरम्यान चलनवाढ होऊ शकते, असे अर्थशास्त्रज्ञ्ज्ञांचे मत आहे.
अर्थशास्त्रज्ञ मायकेल स्ट्रेन यांच्या मते, युरोपध्ये कोणतीही उलथापालथ झाली तरी त्याचा यूएसच्या व्यापार आणि परदेशी गुंतवणुकीवर अप्रत्यक्षपणे नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : जो बायडन यांचा संताप; रशियाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय
- Russia Ukraine War : सायकलस्वारावर आदळला रशियन तोफेचा गोळा; युक्रेन हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
- Russia Ukraine Conflict : अमेरिकेने जर्मनीत पाठवले 7000 अतिरिक्त सैनिक
- Russia Ukraine Conflict : युद्धाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यू, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ