Sri Lanka Political Crisis: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे तिथल्या लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. ज्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनी 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख येऊन ठेपली असून लवकरच तेथे नवीन सरकार स्थापन होणार आहे. भारत या संकटावर लक्ष ठेवून आहे. तसेच तेथे शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचा भारतावर किती व कोणता परिणाम झाला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.


श्रीलंकेतील संकटाचा भारतावर कसा परिणाम होईल?


श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे भारताच्या सागरी व्यापारावर परिणाम होणार आहे. कारण भारताच्या मालवाहू जहाजांच्या वाहतुकीत कोलंबो बंदराचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतात येणारी साठ टक्के जहाजे याच बंदरातून जातात. त्याचबरोबर भारतातील अनेक वस्तू श्रीलंकेच्या बाजारात विकल्या जातात आणि श्रीलंका त्या वस्तूंची खरेदी करतो. भारत दरवर्षी 4 अब्ज डॉलरच्या मालाची श्रीलंकेला निर्यात करतो.


श्रीलंकेतील अस्थिरतेमुळे भारताच्या रिअल इस्टेट आणि पेट्रोलियम रिफायनरी क्षेत्रालाही फटका बसला आहे. कारण भारताची श्रीलंकेतील या क्षेत्रांमध्येही मोठी गुंतवणूक आहे. श्रीलंकेला कर्ज देण्याच्या बाबतीत चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो. अशा परिस्थितीत तिथे परिस्थिती बिघडली तर भारताने दिलेले कर्ज तिथेच अडकून पडेल.


श्रीलंकेत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का?


श्रीलंकेत आणखी काही काळ हिंसक वातावरण राहिल्यास तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथील लष्कराला हस्तक्षेप करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तेथे गृहयुद्धासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठ्या संख्येने श्रीलंकन ​​नागरिक निर्वासित म्हणून भारतात येऊ शकतात. ज्यामुळे भारतालाही देशात निर्वासितांच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल
श्रीलंकेवर आर्थिक संकट! मदत आणि समर्थनासाठी सनथ जयसूर्यानं मानले भारताचे आभार