Al-Zawahiri Killed : दहशतवादी संघटना अल कायदाचा (Al-Qaeda) म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) आज अमेरिकेने खात्मा केला. अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने हेलफायर या क्षेपणास्त्राचा वापर केला. अल जवाहिरीला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हेलफायर या क्षेपणास्त्राच्या हवाई आणि नौदल व्हर्जनचा भारत देखील वापर करतो.  जवाहिरीला हेलफायर क्षेपणास्त्राच्या सिक्रेट R9X 'निंजा बॉम्ब'ने लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाने तीन वर्षांपूर्वी अमेरिकेकडून घेतलेली अपाचे हेलिकॉप्टरही हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. 


भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरमध्ये लाँगबो हेलफायर क्षेपणास्त्र बसवण्यात आले आहे. अपाचे हेलिकॉप्टरमध्ये एअर-टू-ग्राउंड (AGM) हेलफायर बसवलेले आहे. अपाचे हेलिकॉप्टरमध्ये एकूण आठ हेलफायर क्षेपणास्त्रे बसवता येतात. हेलफायर क्षेपणास्त्राचे वजन 47 किलो असून ते 7 ते 11 किमीपर्यंत मारा करते.  


अल-जवाहिरीला मारण्यासाठी अमेरिकेने हेलफायर क्षेपणास्त्राचे गुप्त व्हर्जन आर नाईन एक्स (R9X) वापरले आहे. या क्षेपणास्त्राचे वजन हेलफायर क्षेपणास्त्राइतके आहे. पण त्यात वारहेड म्हणजेच गनपावडर नाही. त्याऐवजी त्यात ब्लेड आहेत, ज्यामुळे ते अचूक लक्ष्यावर आदळते आणि संपार्श्विक नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते. यामुळेच त्याला निन्जा-बॉम्ब असेही म्हणतात.


हेलफायर हे एक मल्टी-मिशन मल्टी-टार्गेट क्षेपणास्त्र आहे जे जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणांवरून सोडले जाते. अपाचे हेलिकॉप्टरशिवाय अमेरिका नौदलाच्या MH-60R म्हणजेच रोमियो हेलिकॉप्टरमध्येही या क्षेपणास्त्राचा वापर करते. भारताने दोन वर्षांपूर्वी अमेरिकेसोबत 24 रोमियो हेलिकॉप्टरचा करारही केला होता. यातील दोन हेलिकॉप्टर भारतात पोहोचले असून तिसरे या महिन्यात पोहोचणार आहे. उर्वरित हेलिकॉप्टर 2025 पर्यंत भारताला मिळणार आहेत. 


 
हेलफायरचा वापर सुरुवातीला शत्रूच्या रणगाडे, ICV वाहने नष्ट करण्यासाठी होत असे. बंकर आणि लष्करी छावण्या देखील नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर होत असे.   


हेलफायरचा हे एक अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र असल्यामुळे 'कॉलेटरल-डॅमेज'चा धोकाही कमी असतो. यामुळेच अल-जवाहिरीला ठार मारण्यासाठी अमेरिकेने हे विशेष हेलफायर क्षेपणास्त्र वापरले. कारण अल जवाहरी ज्या काबुलच्या इमारतीत लपला होता तो निवासी भाग होता. इराणचा लष्करी कमांडर कासिम सुलेमानी याला मारण्यासाठी देखील अमेरिकेनेही हेलफायर आणि प्रीडेटर ड्रोन वापरलं होतं.