एक्स्प्लोर

तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या

नेपाळमधील पुराचा परिणाम आता भारतातही पोहोचण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Nepal Flood: चीनच्या तिबेटमधून आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात हाहा:कार माजला आहे. भोटेकोशी नदीच्या अचानक वाढलेल्या पातळीमुळे तिमुरे आणि स्याब्रुबेसी भागातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रसुवा येथील एक जलविद्युत प्रकल्पही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. एपी वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पुरामुळे मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, 105 भारतीय नागरिकांसह 291परदेशी पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. तिमुरे सीमा चौकीवर तैनात असलेले नऊ पोलीस कर्मचारीही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 25 जणांना वाचवले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी चौदा हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध आणि पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा 

नेपाळमधील पुराचा परिणाम आता भारतातही पोहोचण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर यांचा समावेश आहे. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीत अंदाजे 3 मीटर उंचीच्या अचानक येणाऱ्या पुराच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. रसुवा येथील तिमुरेमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर न उतरता काठमांडूला परतले. स्थानिक हेलिपॅड पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे पायलटला उतरण्यासाठी सुरक्षित जागा सापडली नाही. पायलटने 'काठमांडू पोस्ट'ला सांगितले की, तिमुरे गावाचा मोठा भाग वरून दिसत नव्हता. तो म्हणाला की, त्रिशुली नदीचे पाणी अचानक वेगाने वाढले, जणू काही अडवलेली नदी अचानक फुटली आहे.

ग्लेशियर सरोवर फुटल्याची भीती

रसुवामध्ये गेल्या 24 तासांत 7 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही, त्यामुळे स्थानिक पावसामुळे पूर आल्याचे मानले जात नाही. तिबेटमधील हिमनदी सरोवराच्या स्फोटामुळे (GLOF) भोटे कोशी नदीला अचानक पूर आला असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. 2020 च्या आयसीआयएमओडी-यूएनडीपी (ICIMOD-UNDP) अभ्यासानुसार, भोटे कोशी खोऱ्यात 122 हिमनदी सरोवरे आहेत. नेमके कोणते सरोवर फुटले हे अद्याप निश्चित झालेले नाही; त्याचा उगमस्थान निश्चित करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि तांत्रिक तपासणीचा वापर केला जात आहे. तिमुरेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मृतांची आणि नुकसानीची नेमकी संख्या सध्या निश्चित केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget