Happy New Year 2022 :  आज 31 डिसेंबर. म्हणजेच 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस.  2022 या वर्षामध्ये पदार्पण करताना मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबातील व्यक्तींना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा द्याच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रिक ट्राय करू शकाता. (New Year )


भन्नाट जीआयएफचा वापर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा
giphy.com या वेब साइटवरील जीआयएफचा वापर करून तुम्ही मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन एक जीआयएफ सिलेक्ट करावे लागेल सिलेक्ट केलेल्या जीआयएफची लिंक कॉपी करून ती तुमच्या व्हॉट्स अॅप चॅटवर पेस्ट करावी लागेल.     


नववर्षाच्या शुभेच्छांचे हटके स्टिकर्स
गूगल प्ले स्टोअर या अॅप वर जाऊन  New Year 2022 Stickers for WhatsApp असं टाईप करा. या अॅपवर तुम्हाला अनेक स्टिकर्स पराहायला मिळतील.  त्यानंतर तुम्हाला ‘Happy New Year 2022 Sticker’ हे स्टिकर्सचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपमधील स्टिकर्स तुम्ही व्हॉट्स अॅपवरून तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवू शकता. 


वेगवेगळे सुविचार पाठवा 
नविन वर्षाच्या शुभेच्छा तुम्ही व्हॉट्स अॅपवर वेगवेगळे सुविचार आणि कविता पाठवू शकता. 
मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबामधील व्यक्तींना तुम्ही असे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता-
1. पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा
 तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा 
2. नव्या स्वप्नांची नवी लाट, 
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हिच खरी सुरूवात..


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha