एक्स्प्लोर

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद निवडणूक लढणार

मुंबईतील 26\11 हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातील 2018 ची निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदने यासाठी मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे.

इस्लामाबाद : मुंबईतील 2611 हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातील 2018 ची निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदने यासाठी मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हाफीजनं निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. हाफिजने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची स्वत: हून घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे हाफिज सईदच्या पक्षाला मान्यता देण्यास पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं नकार दिला आहे. त्यामुळे हाफिज डमी उमेदवार किंवा इतर पक्षांची मदत घेऊन उमेदवार निवडणुकीत उभे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, 2611 हल्ल्या मागं हाफिज सईद मास्टर माईंड असल्याचे सबळ पुरावे पाकिस्तानला पुरवूनही पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नसल्याचा आव आणला आहे. तर हाफिजची नुकतीच दहा महिन्याच्या नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर, पाकिस्तानातल्या अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. लाहोरमध्ये त्याच्या सुटकेबद्दल पुष्पवृष्टी करण्यात आली. कोण आहे हाफिज सईद? हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. संबंधित बातम्या हाफिज सईदला पुन्हा डांबलं, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमलं माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UN कडे मागणी हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता 26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट ‘हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी’

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget