Google Doodle Today Anne Frank : गुगलने (Google) खास डुडलद्वारे (Doodle) प्रसिद्ध ज्यू जर्मन-डच डायरिस्ट आणि होलोकॉस्ट पीडित ॲनी फ्रँक यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ॲनी फ्रँक यांच्या डायरीच्या प्रकाशनाचा आज 75 वा वर्धापन दिन आहे. गुगलनं यानिमित्तानं खास डुडल बनवत त्यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित स्लाईडशो बनवला आहे. 


कोण होती ॲनी फ्रँक?
ॲनी फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू कुटुंबातील मुलगी. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून त्याच्या कुटुंबातली चार आणि आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर सुमारे दोन वर्षे लपून रहातात. या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. या संकटातून आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर हे जगत राहतात. ॲनी फ्रँकचा वाढदिवसाला तिचे वडील तिला एक डायरी भेट देतात. यानंतर ॲनी फ्रँक डायरी लिहिण्यास सुरुवात करते. 


4 ऑगस्ट 1944 रोजी त्यांच्यासह कुटुंबाला बंदी बनवण्यात आलं
हिटलरच्या सैन्यापासून लपून जीवन घालवताना इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहण्या घडलेल्या छोट्या-मोठ्या घटाना तिनं या डायरीमध्ये लिहील्या. नंतर हिटलरचे सैनिक तिला आणि तिच्या कुटुंबासह दुसऱ्या कुटुंबालाही पकडून छळ छावणीमध्ये नेतात. यावेळी छळ सहन करताना आठपैकी सात जणांचा मृत्यू होतो. 




ॲनीचे वडील ऑटो फ्रँक (Otto Frank) हेच या छळछावणीतून सुटका करुन घेण्यात यशस्वी होतात. नंतर त्यांना ॲनीची डायरी सापडते. या डायरीतील ॲनी त्यांनी आपण ओळखत असलेल्या ॲनीहून वेगळी वाटते. या डायरीचं त्यांनी 1947 पहिल्यांदा प्रकाशन केलं. त्यानंतरच्या काळात या डायरीचा 70 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. बायबलनंतर सर्वाधिक वाचलं जाणारं हे दुसऱ्या क्रमांकाचं पुस्त आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या