Amazon Alexa Voice : नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणजे ॲलेक्सा (Alexa). ॲलेक्सा ॲमेझॉन व्हॉईस असिस्टंट सॉफ्टवेअर (Voice Assistant Software) आहे. आगामी काळीत ॲमेझॉन ॲलेक्सा तुम्हाला तुमच्या आवाजात बोलताना ऐकू येणार आहे. ॲमेझॉन ॲलेक्सामध्ये नवीन फिटर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फिचरनुसार ॲलेक्सा जिवंत किंवा मृत कोणाच्याही आवाजाची नक्कल करु शकणार आहे. ॲमेझॉनने रि:मार्स परिषदेत (re:MARS conference) बुधवारी या नव्या फिचरबाबत घोषणा केली आहे.
आठवणींना उजाळा देण्यासाठी (Make Memories Last) या उपक्रमाअंतर्गत ॲमेझॉन नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीनं यावेळी सांगितलं आहे की, 'येत्या काळात ॲलेक्सा कोणत्याही व्यक्तीचा आवाज सुमारे एक मिनिटे ऐकल्यानंतर त्या आवाजाची नक्कल करत त्या आवाजात बोलू शकेल.' या संबंधित एक ॲमेझॉनने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलं ॲलेक्साला त्याच्या आजीच्या आवाजात गोष्ट वाचण्यासाठी सांगतो. यानंतर ॲलेक्सा त्या मुलाच्या आजीच्या आवाजाची नक्कल करतो.
ॲलेक्साला कोणत्याही आवाजाची नक्कल करता यावी यासाठी कंपनीनं नवीन प्रणाली विकसित करण्याची योजना आखली आहे. हे फिचर आल्यावर तुम्ही ॲलेक्सा कोणत्याही आवाजाची नक्कल करु शकेल. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या जिवलग व्यक्तीचा आवाज ऐकू शकता. तुम्हाला या फिचरचा वापर करुन तुमच्या मृत जिवलग व्यक्तीच्या आवाजात आठवणींनाही उजाळा देऊ शकता.
पुढे कंपनीनं सांगितलं आहे की, हे नवं फिचर सध्या किती विकसित आहे आणि कधीपर्यंत येईल याबाबत अद्याप काही स्पष्ट सांगता येणार नाही. व्हॉइस-मिमिकिंग (Voice Mimicking) फिचर आणण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी व्हॉईस पॅटर्नची अचूक ओळख आणि वापर करावा लागेल. असंही कंपनीनं सागितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Amazon Sale : Alexa वर आधारित हा आहे OnePlus चा नवीन स्मार्टफोन, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 25 हजारांपर्यंत सूट!
- Jio चा जबरदस्त प्लान; Amazon Prime, Hotstar, Netflix मिळणार मोफत
- Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्यांना कामावरून काढलं