Apple Store Workers Union in US : अमेरिकेत ॲपल (Apple) स्टोरनं ट्रेड युनियन तयार करण्यासाठी बहुमतानं प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेतील Apple Store च्या बहुसंख्य कर्मचार्‍यांनी युनियन तयार करण्यासाठी मतदान केलं. अमेरिकेच्या मेरीलँडच्या  टॉवसन येथील मेरीलँड ॲपल स्टोरच्या कर्मचाऱ्यांचं युनियन तयार करण्यावर एकमत झालं आहे. मतदानाची देखरेख करणार्‍या फेडरल एजन्सीने शनिवारी प्रसारित केलेल्या थेट मोजणीनुसार, स्टोरमधील 110 कर्मचार्‍यांपैकी 65 लोकांनी बाजूने आणि 33 विरोधात मतदान केलं. 


AppleCORE नावाच्या (संघटित किरकोळ कर्मचार्‍यांची संघटना) कर्मचार्‍यांच्या गटाने युनियन तयार करणासाठी प्रचार केल्यानंतर हे मतदान घेण्यात आलं. यावर कर्मचाऱ्यांनी बहुमतानं युनियन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. AppleCORE ने ट्विट करत म्हटलं आहे की, 'आम्ही युनियन तयार करण्याचा प्रस्ताव बहुमतांनी जिंकला आहे. ज्यांनी यासाठी कठोर परिश्रम केले आणि समर्थन केले त्यांचे आभार. आमच्यासाठी हा क्षण उत्सव साजरा करण्यासारखा आहे.'


AppleCORE ने ट्विट करत म्हटलं आहे की, 'एजन्सीने निकाल जारी केल्यानंतर मशीनिस्ट आणि एरोस्पेस कामगारांची आंतरराष्ट्रीय संघटना (IAM) युनियनने स्वतःची शाखा स्थापन करावी.' दरम्यान, IAM चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रॉबर्ट मार्टिनेझ ज्युनियर यांनी कामगारांच्या धाडसाचं कौतुक करत म्हटलं की, 'मी ॲपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांना निवडणुकीच्या निकालांचा आदर करत टॉवसन येथील कर्मचाऱ्यांची युनियन तयार करण्यासाठी जलद पाऊलं उचलावीत.'






महत्त्वाच्या इतर बातम्या