Ghislaine Maxwell Convicted : ब्रिटिश सोशलाइट घिसलेन मॅक्सवेल ही बुधवारी (29 डिसेंबर) लैंगिक शोषणासाठी तरुण मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. दिवंगत अमेरिकी फायनान्सर जेफरी एपस्टीनसाठी घिसेलन मुलींची तस्करी करत होती. या गुन्ह्यासाठी 12 सदस्यीय ज्युरीने घिसलेन मॅक्सवेलला तरुण मुलांच्या लैंगिक तस्करीप्रकरणी दोषी ठरवले आहे.


रिपोर्टनुसार,12  ज्युरी सदस्यांमधील 6 सदस्यांनी घिसलेनच्या शिक्षेच्या बाजूने तर 5 सदस्यांनी विरोधात मतदान दिलं. या घटनेनंतर असे मानले जात आहे की, माजी ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट मॅक्सवेल यांची मुलगी  घिसलीन मॅक्सवेलला आता तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कायद्यानुसार, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करी प्रकरणात जास्तीत जास्त 40 वर्षांची शिक्षा होते. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन न्यायालयात न्यायाधीश अ‍ॅलिसन नॅथन यांनी निकाल देताना घिसलीन शांतपणे बसली होती. 


घिसलेन दोषी ठरल्यानंतर, न्यायाधीशांनी सर्व ज्युरी सदस्यांचे आभार मानले. घिसलेन दोषी ठरवल्यानंतर न्यायाधीशांनी न्यायालयीन कामकाज स्थगित केले. त्यानंतर घिसलीनला कोर्टरूममधून थेट पोलिस कोठडीत नेण्यात आले. घिसलेनच्या शिक्षेची सुनावणेची तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही. 1994 ते 2004 या काळात घिसलेननं केलेल्या गुन्ह्यासाठी तिला आता शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 


घिसलेनने ती निर्देषी असल्याचे सांगितलं
घिसलेनच्या वकिलांनी सांगितले की  मुलींची तस्करीमुळे अटकेत असलेल्या एपस्टीनचा कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे आता घिसलेनचे नाव या सर्व प्रकरणात घेण्यात येत आहे. लैंगिक शोषण आणि तस्करी प्रकरणात आरोपांचा सामना करत असलेल्या 66 वर्षाचे अरबपती एपस्टीनचा 2019 मध्ये कारागृहातच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला आत्महत्या ठरवण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ द्या, लोकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल; डॉक्टरांच्या दाव्यातील नेमकं तथ्य काय?


कोरोनाचा पुन्हा विस्फोट! फ्रान्स अन् अमेरिकेत माजवला हाहा:कार, WHO ने दिला इशारा


महिलेने लाडक्या कुत्र्याचा साजरा केलेला जंगी वाढदिवस पाहून सर्वच हैराण, ड्रोन शोसाठी खर्च केले लाखो रुपये