Omicron Variant : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. नुकत्याच समोर आलेल्या संशोधकानुसार, ओमयाक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झपाट्याने होत आहे, त्यामुळे रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत वैज्ञानिकांनी अद्याप कोणताही मोठा दावा केलेला नाही. दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील डेटा पाहिल्यानंतर असं समोर आलेय की, ओमायक्रॉनबाधित रुग्णाचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं अथवा मृताची संख्या खूप कमी आहे. त्यानंतरही जगभरातील तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन धोकादायक आहे की नाही हे पाहण्यासाठी अद्याप संशोधन करणं गरेजचं आहे. तसेच काळजी घेणेही गरजेचं आहे.
जगभरात ओमायक्रॉनबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असतानाच डॉक्टरांनी ओमायक्रॉन घातक नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन आणि संचारबंदी लावून ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखू नये. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ द्या, असा दावा अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांनी केलाय. यामध्ये सर्वात मोठं नाव अमेरिकेतील डॉक्टर एफसाइन इमरानी यांचं आहे. एफसाइन इमरानी कॅलिफोर्निया येथील हृदयरोग तज्ज्ञ आहेत. कोरोना महामारीमध्ये एफसाइन इमरानी यांनी अनेक रुग्णावर उपचार केले आहेत.
काय आहे डॉक्टरांचा दावा?
डॉक्टर इमरानी यांच्यासोबत इतर इनेक संशोधकांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे लोकांना गंभीर आजार होणार नाहीत. तसेच रुग्णालयात उपचार घेण्याचीही गरज पडणार नाही.
ब्रिटन आणि दक्षिण अफ्रीकामधील आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमयक्रॉनबाधित रुग्णाची हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता 70 टक्के कमी आहे.
इतकेच नाही तर ओमायक्रॉनमुळे मृत्यूची शक्यताही कमी आहे.
तसेच ओमायक्रॉनमुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होईल, जी मोठ्या कालावधीपर्यंत राहू शकते. ज्यामुळे कोरोना महामारीचा शेवट सुरु होईल.
डॉक्टरांच्या दाव्यामागील तथ्य काय आहे?
डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंट हवेत 70 पटीने अधिक वेगानं पसरतो, त्यामुळे संसर्ग अतिशय झपाट्यानं होतोय. पण डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन बाधित रुग्णांना गंभीर आजार होण्याचा कमी धोका आहे, याबाबतचं संशोधन समोर आलं आहे. फुफस आणि श्वासनलिका यांना जोडणाऱ्या नलिकामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट अतिशय वेगाने वाढतो, याचा फुफसावर जास्त प्रभाव होत नाही, असं संशोधनातून समोर आलं आहे.
डॉक्टरांच्या दाव्यानुसार, डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन फुफसावर कमी वेगानं प्रभाव पाडतो. त्यामुळे ओमायक्रॉनबाधित रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट अधिक गरज भासत नाही. त्याशिवाय आपल्या श्वासनलिकामध्ये म्यूकोसल इम्यून सिस्टम असते, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं केंद्र आहे. ओमायक्रॉन येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात करते तेव्हा म्यूकोसल इम्यून सिस्टम सक्रीय होतं. म्यूकोसल इम्यून सिस्टममधून तयार होणाऱ्या अँटिबॉडी ओमायक्रॉनचा खात्मा करण्यास सुरु करतात. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका कमी होतो. उलट ओमायक्रॉनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू होणार नाही, असं आपण म्हणून शकत नाही. आधीपासून गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना याचा आधिक धोका होऊ शकतो. मात्र, निरोगी व्यक्तींविरोधात ओमायक्रॉन कमी धोकादायक आहे. अशाप्रकारे ओमायक्रॉन नैसर्गिक लसीचं काम करु शकते अन् महामारीचा खात्मा होऊ शकतो, असे एफसाइन इमरानी यांनी सांगितलेय.
डॉक्टरांच्या दाव्यावर विश्वास ठेवू शकतो का?
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळी कोरोना विषाणूची भीती संपवण्यासाठी अनेक दावे करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टर इमरानी यांच्यासह अनेक तज्ज्ञांचा समावेश होता. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसल्याचं तेव्हा म्हटलं होतं. स्वीडनचा लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय त्यावेळी अचूक ठरला होता. तेव्हा डॉक्टर इमरानी यांनी तरुण आणि निरोगी लोकांना लस न देण्याचा सल्लाही दिला होता. त्यांचे हे दावे नंतर चुकीचे ठरले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे स्वीडनमध्ये पाहायला मिळालं. स्वीडनने लॉकडाऊन लावण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत स्वीडनमध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. नॉर्वेच्या तुलनेत स्वीडनमध्ये चारपटीने कोरोना रुग्ण आढळले. तसेच निरोगी आणि तरुणांना लस न देण्याचा इमरानी यांचा दुसरा दावाही फोल ठरला. कारण, डेल्टा व्हेरियंटमुळे तरुण आणि लहान मुलं सर्वाधिक बाधित झाले.