एक्स्प्लोर

Germany Train Station Attack: जर्मनीतील रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा चाकू हल्ला; 18 जण जखमी, संशयित महिलेला अटक

Germany Train Station Attack:जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर चाकू हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे आणि हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Germany Train Station Attack: जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जर्मनीच्या बिल्ड वृत्तपत्रानुसार, काल (शुक्रवारी) संध्याकाळी हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर झालेल्या चाकू हल्ल्यात 18 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी एका महिलेला संशयित म्हणून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे आणि इतर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत, असे बिल्डने वृत्त दिले आहे. तर हॅम्बुर्ग पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, जखमींची संख्या उपलब्ध झालेली नाही, परंतु "अनेक" व्यक्तींना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्टेशनवरील ट्रॅक 13 आणि 14 दरम्यान प्लॅटफॉर्मवरील लोकांना लक्ष्य केले. जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर हॅम्बुर्गच्या मध्यभागी स्थित, हे स्टेशन स्थानिक, प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रादेशिक प्रसारक एनडीआरच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हॅम्बुर्ग स्टेशनवर वाट पाहणाऱ्या ट्रेनसमोर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा हल्ला झाला. या घटनेनंतर, प्लॅटफॉर्मवर एक हाय-स्पीड आयसीई ट्रेन दिसली ज्याचे दरवाजे उघडे होते,  यावरून असे दिसून येते की, प्रवासी चढत असताना किंवा उतरत असतानाच हा हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर, शुक्रवारी संध्याकाळी स्टेशनवरील चार ट्रॅक बंद करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर झाला आणि त्यांचे मार्ग बदलण्यात आले.

हॅम्बुर्ग पोलिसांचे प्रवक्ते फ्लोरियन अबेन्सेथ यांनी घटनेबाबत माहिती देताना म्हटलं, "आतापर्यंत आमच्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीत की महिलेने राजकीय प्रेरणेने हे कृत्य केले असावे.त्याऐवजी, आमच्याकडे असे निष्कर्ष आहेत ज्यांच्या आधारे आम्ही आता विशेषतः ती मानसिक रूग्ण आहे का याचा तपास करत आहोत," असे त्यांनी पुढे सांगितले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळास्थळी सतर्क राहण्याचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिस संशयित महिलेची चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

Embed widget