नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून एका खुर्चीवर बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो सोशल मीडियायवर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटोच नव्हे, तर त्यावर आधारित धमाल मीम्सही नेटकऱ्यांच्या विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा यांच्या फोटोंमध्येही ते दिसले. दीपिकाच्या स्वयंपाकघताच ते पोहोचले असं एक मीमही व्हायरल झालं. खुद्द दीपिकानंही ते शेअर केलं. देसी गर्ल प्रियांका चोप्रा, डेडपुल फेम अभिनेता Ryan Reynoldsनंही एक फोटो पोस्ट केला. जिथं तो चित्रीकरणादरम्यान स्क्रीप्ट वाचताना दिसत आहे, तर हे व्यक्ती त्यांच्याच बाजूला बसलेले दिसत आहेत.

आता ते आहेत तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यातील हा फोटो. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी हा फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या फोटोत दिसणारी ही वृद्ध व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे सेनेटर बर्नी सँडर्स.








मदतनिधी गोळा करण्यासाठी सँडर्सही करताहेत त्यांच्याच व्हायरल फोटोचा वापर

एकिकडे सोशल मीडियावर आपला फोटो व्हायरल होत असतानाच पाहून युएस सेनेटर बर्नी सँडर्स यांनी ही बाब अतिशय सकारात्मकतेनं घेत त्यांच्या व्हायरल फोटोचा वापर मदतनिधी गोळा करण्यासाठी केला आहे. कपड्यांवर हा फोटो छापत त्या कपड्यांची विक्री करत या माध्यमातून मदतनिधी गोळा करण्यात येत आहे. ‘Meal on Wheels’ या अनोख्या उपक्रमासाठी हा मदतनिधी गोळा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वत:साठी अन्न शिजवू न शकणाऱ्या अनेक गरजूंपर्यंत खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो.