फरारीने फॉर्म्युला वन टीमच्या ड्रायव्हर्स अकॅडमीमध्ये पहिल्यांदाच महिलेचा समावेश केला आहे, 16 वर्षीय डच गो-कार्टर माया वेग हिला फॉर्म्युला वनच्या ड्रायव्हर्स अकॅडमीचा भाग व्हायची संधी मिळतेय. फरारी ड्रायव्रर अकॅडमी आणि मोटर्सपोर्ट कमिशनच्या संयोजन समितीतर्फे आयोजित FIA's Inaugural Girls on Track - राइझिंग स्टार्स प्रोग्रामची ती विजेता आहे. इटालियन संघाच्या पाच दिवसीय स्काऊटिंग शिबिराच्या वेगला मॅरेनेलो मुख्यालय आणि फिओरानो टेस्ट ट्रॅक स्काऊटिंग शिबिरासाठी स्पर्धेत स्थान देण्यात येणार आहे.





वेगचा जन्म स्पेनमध्ये झाला, तिची आई बेल्जियन आहे आणि वडील डच आहेत. ही बातमी मिळाल्यानंतर तिने आपल्या भावना सांगितल्या,"मी हा दिवस कधीच विसरणार नाही! फरारी चालक अकॅडमीत सामील होणारी पहिली महिला ड्रायव्हर असल्याचा मला खूप आनंद झालाय. गर्ल्स ऑन ट्रॅक, राइझिंग स्टार्स प्रोग्रामचा अंतिम टप्पा जिंकल्यामुळे मला जाणवलं की मी रेसिंग ड्रायव्हर आहे. मी माझी स्वप्न पूर्ण करण्याच्या योग्य मार्गावर होते", असं वेग म्हणाली.


गेल्या आठवड्यात फरारीच्या मॅरेनेलो हेडक्वॉर्टर्सच्या स्पर्धेत वेग हिने अंतिम फेरीत असलेल्या तीन स्पर्धकांना पराभूत केले. वेगला यंदाच्या FIA's Formula 4 या चॅम्पियनशिपमध्येही रेसिंगसाठी स्थान मिळणार आहे. "मी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आभार मानते, ज्यांनी मला फरारीच्या ड्रायव्हर अकॅडमीचा युनिफॉर्म घालण्याच्या लायक समजलं. मी माझ्या सिंगल-सीटर रेसिंगच्या पहिल्या हंगामाची तयारी सुरू करण्यासाठी मॅरेनेलोची वाट पाहत आहे." 1976 मध्ये इटलीची लैला लोमबर्डी ही एफ 1 मधील शर्यतीतील शेवटची महिला होती. त्यामुळे वेगचा आता महिला गो-कार्टर म्हणून केलेला समावेश एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.





“आमच्या फॉर्म्युला 1 टीमसाठी, भविष्यातील रेसर्सना आणि एफडीएसाठी हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा क्षण आहे,” असे फेरारी टीमचे मुख्य मॅटिया बिनोटो यांनी सांगितले.या अकॅडमीने आतापर्यंत पाच गो-कार्टर्सना ज्युनिअर सीरिजमधून फॉर्म्युला वनमध्ये पोहोचण्यास मदत केली आहे,  या मोसमात या मोसमात फरारी ड्रायव्हर चार्ल्स लेकलर आणि मिक शुमेकर, द ग्रेड मायकल शूमेकर यांचा मुलगा असे स्पर्धक असणार आहेत.


अकॅडमीचे मॅनेजर मार्को मटासा म्हणाले की, "चार महिला अंतिम स्पर्धकांपैकी एकीने स्काउटिंग शिबिराच्या इतिहासात  सर्वोच्च क्रमांकाची नोंद केली.