एक्स्प्लोर

Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय

Flydubai Incident Benjamin Netanyahu : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये घुसून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमागे असलेल्यांना सोडणार नाही, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला.

मुंबई : 'फ्लायदुबई'च्या (Flydubai) विमानातील कॉकपिटमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ संदेश जारी करत अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेमागे जे कोणी मास्टरमाईंड आहेत किंवा ज्यांनी या हल्लेखोराला पाठवले आहे, त्यांना याची अत्यंत मोठी किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे.

Netanyahu Statement On Flydubai : 11 सप्टेंबरसारखी मोठी दुर्घटना टळली

नेतन्याहू यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, "तपासाची चक्रे जशी फिरत आहेत, तशी यामागील खरी माहिती समोर येत आहे. निष्णात वैमानिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडस दाखवत 11 सप्टेंबर (9/11) सारखी मोठी आणि भयानक घटना घडण्यापासून रोखली आहे."

तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानुसार, हा हल्लेखोर इस्लामी कट्टरपंथी विचारांनी प्रभावित झाला होता. विमानातील सर्व प्रवाशांसह हे विमान क्रॅश करण्याचा त्याचा उद्देश होता, असेही नेतन्याहू यांनी स्पष्ट केले.

Iran Link Under Investigation : इराणचा हात असल्याचा संशय; चौकशी सुरू

हा हल्ला करण्यासाठी या दहशतवाद्याला कुणी पाठवले होते का, याचा शोध सध्या तपास यंत्रणा घेत आहेत. या घटनेमागे इराणचा (Iran) काही हात आहे का, या अंगानेही इस्रायली यंत्रणा तपास करत असल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचणे सध्या घाईचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या बाजूला, इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी ही घटना म्हणजे 'जिहादी दहशतवादी हल्ल्याचा' प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

UAE President Advisor On Terrorist Act : यूएईच्या सल्लागारांकडून दहशतवादी कृत्य घोषित

यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अध्यक्षांचे सल्लागार अन्वर गर्गश यांनी या घटनेला स्पष्टपणे 'दहशतवादी कृत्य' (Terrorist Act) असे संबोधले आहे. या घटनेला दहशतवादी जोड असल्याचे अधिकृतपणे मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कॅप्टन स्मित माछार यांच्या धैर्याचे कौतुक करताना गर्गश म्हणाले की, वैमानिकाने प्रसंगावधान राखत संभाव्य मोठा अपघात टाळला आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी पार पाडली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा षडयंत्राच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही यूएई प्रशासनाने केले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
Embed widget