एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या कराचीत बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू आणि 20 जखमी

पाकिस्तानच्या कराचीमध्ये दोन मजली इमारतीत स्फोट झाला. यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले असून 20 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

कराची: पाकिस्तानच्या कराची शहरात बुधवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या एका बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 लोक जखमी झाले आहेत. गुलशन-ए-इकबाल परिसरातील मस्कन चौरंगी या ठिकाणी दोन मजली इमारतीत हा स्फोट झाला. यामुळे आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. काही लोकांच्या मते हा सिलेंडरचा स्फोट आहे. असे असले तरी बॉंब तपास पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

कराची शहरात काल रात्री पाकिस्तानचे लष्कर आणि सिंध पोलिस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळी या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते.

इम्रान खान सरकारविरोधात असंतोष रविवारी कराचीत इम्रान खान सरकारविरोधात 11 विरोधी पक्षांच्या महागठबंधन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटने मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीचे नेतृत्व नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी केले होते. त्यानंतर मरियम शरिफ यांचे पती कॅप्टन मोहम्मद सफदर यांना अटक केली होती. तसेच मरियम यांच्यावरही खटला दाखल केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्कर आणि सिंध पोलिस समोरासमोर आले होते.

गेले काही दिवस पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार विरोधात असंतोष विरोधी पक्षात आणि लोकांत असंतोष खदखदत आहे. विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात रान उठवलं आहे. ताज्या वृत्तानुसार सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माईल यांच्या घराभोवतीचा परिसर लष्कराने ताब्यात घेतला आहे आणि आता या कारणावरुन सिंध पोलिस आणि लष्कर पुन्हा आमने सामने आले आहेत. सिंध पोलिसांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याआधी एक दिवस कराचीत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराशेजारी एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 5 लोक जखमी झाले होते. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या स्फोटामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 
हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
Shaina NC: सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Embed widget