एक्स्प्लोर

वय वर्ष 34, फिनलॅण्डच्या सना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान!

34 वर्षीय मरिन या केवळ फिनलॅण्डच नाही तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. यापूर्वी हा मान यूक्रेनचे पंतप्रधान ओलिंस्की होन्चारुक यांच्या नावावर होता.

मुंबई/हेलिंस्की : वयाच्या अवघ्या 34 वर्षात पंतप्रधान! होय, सना मरिन फिनलॅण्डच्या नव्या पंतप्रधान बनल्या असून त्यांचं वय केवळ 34 वर्ष आहे. फिनलॅण्डच्या राजकीय इतिहासात सना मरिन या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. साऊली नितीस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सना मरिन पंतप्रधान बनतील अशी अटकळ बांधली जात होती. सना मारिन थेट पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नाहीत. याआधी त्या परिवहन आणि दूरसंचारमंत्रीही होत्या. राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल करणाऱ्या फिनलॅण्डची जबाबदारी आता सना मरिन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सना मरिन यांच्या मंत्रीमंडळात महिलांचा भरणा आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या देशाच्या सत्ताधारी पक्षाने अँटी रिनी यांच्या राजीनाम्यानंतर सना मरिन यांची निवड केली आहे. "नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी पूर्णत: तयार आहे," असं सना मरिन म्हणाल्या. सना मारिन यांच्या नावावर सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम 34 वर्षीय मरिन या केवळ फिनलॅण्डच नाही तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. यापूर्वी हा मान यूक्रेनचे पंतप्रधान ओलिंस्की होन्चारुक यांच्या नावावर होता. आतापर्यंत ते जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. परंतु आता सना मरिन यांनी वयाच्या 34 वर्षी पतंप्रधानपदी विराजमान होऊन हा मान आपल्या नावावर केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न 39 वर्षांच्या आहेत, तर यूक्रेनचे पंतप्रधान ओलिंस्की होन्चारुक 35 वर्षांचे आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनबाबत असं म्हटलं जातं की तो 35 वर्षांचा आहे. सना मरिन या फिनलॅण्डच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. कोण आहेत सना मारिन? - सना मरिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये फिनलॅण्डमध्ये झाला होता. - 2012 मध्ये टॅम्पियर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली. यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. - 2015 मध्ये सना पहिल्यांदा संसदेच्या सदस्य झाल्या. - 2017 मध्ये त्यांची सिटी काऊन्सिलमध्ये निवड झाली. - 2019 मध्ये त्या पहिल्यांदा सरकारमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी परिवहन आणि दूरसंचार मंत्रालय सांभाळलं. समलैंगिक पालकांनी संगोपन केलं, मारिन यांना एक मुलगी सना मरिन याच आठवड्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. सेंटर-लेफ्ट आघाडीचं नेतृत्त्व मारिन यांच्या हाती असेल आणि त्यांना इतर पाच पक्षांसोबत एकत्र काम करुन सरकार चालवायचं आहे. विशेष बाब म्हणजे या पाच पक्षांच्या प्रमुख या महिला आहेत. सना विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. रंजक गोष्ट म्हणजे त्यांचं पालनपोषण, संगोपन समलैंगिक पालकांनी केलं आहे. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचं श्रेय आपल्या पालकांनाच देतात. 'वय, स्त्री-पुरुषाने मला फरक पडत नाही' पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या सना मरिन म्हणाल्या की, "माझ्यासाठी कमी वय किंवा महिला असणं ही बाब महत्त्वाची नाही. मी कधीही माझं वय आणि स्त्री-पुरुष असा विचार केला नाही. मी फक्त अशा गोष्टींचा विचार करते, ज्यातून मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. राजकारणात माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या लोकांबाबत मी विचार करते." फिनलॅण्डची राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल फिनलॅण्ज सध्या राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल करत आहे. याची सुरुवात पोस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाने झाली. संपूर्ण देशभरातील पोस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनामधील कपातीविरोधात आंदोलन केलं. मात्र नोव्हेंबरच्या अखरेच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला, परंतु पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget