एक्स्प्लोर

US election 2020 : शेवटच्या वादविवादात जो बायडन यांची ट्रम्प यांच्यावर सरशी; पण, मतदानावर परिणाम होईल?

US election 2020 (अमेरिकन निवडणूक 2020) : शेवटच्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात तुफान खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. या वादविवादात जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर सरशी केलेली पाहायला मिळाली.

वॉशिंगटन : जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यातला दुसरा आणि शेवटची डिबेट काल (गुरुवार) पार पडली. पहिल्या डिबेटमधली चर्चा अक्षरशः उधळली गेल्याच्या पार्श्वभूमीवर, या डिबेटमधे बर्‍याच प्रमाणात मुद्देसूद चर्चा झाली. हा डिबेट लोकांना आवडला असला, तरी त्याचा मतदानावर काही परिणाम होईल का याविषयी साशंकता आहे.

मागच्या डिबेटपेक्षा यावेळी ट्रम्प यांचा परफॉर्मन्स बराच चांगला झाला असला, तरी त्यांना बायडन यांच्यावर मात करता आली नाही. पहिल्या डिबेटमधे केलेल्या आक्रस्ताळ्या वर्तनामुळे ट्रम्प यांनी बरीच आघाडी गमावली होती. या शेवटच्या डिबेटमध्येसुध्दा कोविड, हेल्थकेअर, वर्णद्वेषी वातावरण, निर्वासित बालकांना दिलेली वागणूक यासारखे मुद्दे ट्रम्प यांना अडचणीचे ठरले. क्लायमेट चेंजबद्दल बोलताना जाता-जाता त्यांनी भारताबद्दल अनुदार टिप्पणी केली, ती वेगळीच. आणि दुसरीकडे बायडन यांनी आपण देशाला सर्वसमावेशक नेतृत्व देऊ, असा दावा केला.

प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत आपला विजय होणं लोकांसाठी आणि देशासाठी कसं महत्वाचं आहे, हे लोकांसमोर मांडण्याची शेवटची संधी म्हणजे शेवटचा डिबेट असतो. मात्र, बायडन यांच्या बाजूनं झुकलेलं जनमत चाचण्यांचा कौल पाहता, लोकांपर्यंत काही नवीन संदेश घेऊन जाण्याची आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची वेळ निघून गेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 5 कोटी लोकांनी मतदान करुनही झालंय. अर्ली व्होटिंगचं हे प्रमाण अभूतपूर्व आहे. त्यामुळे कुंपणावर बसून न राहता कोणाचे पाठिराखे किती प्रमाणात मतदान करतात, एवढ्यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. आता उरलेल्या दहा-बारा दिवसात, आपापल्या मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न राहील.

2016 सालच्या निवडणुकीत निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना, तत्कालीन एफबीआय प्रमुख जेम्स कोमी यांनी केलेल्या एका घोषणेमुळे, तीन ते चार टक्के मतं फिरली आणि ती ट्रम्प यांच्या पारड्यात पडली. हिलरी क्लिंटन यांच्या पराभवातलं ते एक प्रमुख कारण ठरलं. यावेळी असं काही 'ऑक्टोबर सरप्राइज' येणार का? यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणुकीचा निकाल इलेक्टोरल कॉलेज पध्दतीमुळे ठरत असल्यानं, ससा आणि कासवाच्या या शर्यतीत कोण जिंकणार ही गोष्ट अजून गुलदस्त्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget