एक्स्प्लोर

पाकिस्तानमध्ये गूगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब, टिकटॉकची सेवा बंद होणार? इम्रान सरकारच्या 'या' निर्णयाचा फटका

गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्यांची सेवा पाकिस्तानमधून बंद होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने आणलेलं एक विधेयक त्यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हं आहेत. सरकारच्या आडमुठ्या निर्णयामुळे पाकिस्तानमधून फेसबुक, युट्युब, टिकटॉक आणि अन्य सोशल मीडिया बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेग्युलेट करण्यासाठी एक विधेयक आणत नियम लागू केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित आशिया इंटरनेट कॉलिशन (AIC) ने सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.

AIC ने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, नव्या नियमांच्या अंतर्गत एसीआयचे सदस्य असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला पाकिस्तानी युझर आणि व्यवसायासाठी सेवा देण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत. एआयसीने म्हटलं आहे की, सध्याच्या रेग्युलेशनमध्ये पाकिस्तानमध्ये सेवा सुरु ठेवणं कठिण होणार आहे. जर पाकिस्तानने डिजिटल सेन्सॉरशीप कायद्यात बदल केला नाही तर पाकिस्तानमधील आपली सेवा बंद करण्यात येईल, असं इम्रान खान यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर, याहू, अॅपल, अमेझॉन आणि लिंक्ड-इन सारख्या कंपन्या एआयसीच्या सदस्य आहेत.

अमेरिका- तालिबानमध्ये शांतता करार, 14 महिन्यात अमेरिका सोडणार अफगाणिस्तान

पाकिस्तानात सोशल मीडियावर नियंत्रण, अभिव्यक्ती स्वातंत्र, आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी नुकसानदायक होऊ शकतं, असा अंदाज काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील व्यक्त केला होता.

काय आहे पाकिस्तान सरकारचा निर्णय

इम्रान सरकारने काही दिवसांपूर्वी कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला. यामध्ये सोशल मीडिया कंपन्यांना पाकिस्तानात कार्यालय सुरु करणे आणि नोंदणी करणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. सोबतच फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, टिकटॉक आणि अन्य सोशल मीडियासाठी पाकिस्तानात डाटा सर्व्हर बनवणं बंधनकारक करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच एका प्रतिनिधीची तिथं नियुक्ती केली जावी. तो प्रतिनिधी पाकिस्तान सरकारकडून गठीत केलेल्या प्राधिकरणाशी संपर्कात असेल.  या विधेयकात म्हटलं आहे की, या सोशल मीडिया कंपन्यांना एका वर्षाच्या आत आपलं सर्व्हर स्थापन करावं लागेल. सरकारवर टीका करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक असणारे संदेश देणाऱ्यांची माहिती गुप्तचर संस्थांना द्यावी, असे अनेक नियम यात केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Video: तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Embed widget