न्यूयोर्क : या वर्षी अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकी आधीच देशातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक राष्ट्रध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प विरुद्ध ट्विटर अशी न होता ट्विटर विरुद्ध फेसबुक होते की काय अशी चिन्ह दिसू लागली आहे. देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया ही निष्पक्ष न राहता एक पार्टीचं रुप घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारताच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जातो. कारण, भारतात लोक माध्यमं वापरण्याचे प्रमाण प्रचंड आहे.


याची सुरुवात राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्विट वर फॅक्ट चेकचा इशारा देऊन हे ट्विट हाइड केल्याने झाली. या घटनेनंतर डॉनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर कंपनीला इशारा दिला. मात्र, त्यानंतरही ट्विटरकडून हा निर्णय मागे घेण्यात आला नाही. त्यावर सोशल मीडियावर लगाम लावण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांनी आदेश दिले आहे. यामध्ये डॉनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर वर आरोप लावले आहेत. माझ्या कार्यकारी आदेश अंतर्गत संचार नियम अध्याय 230 नुसार नवीन नियम बनवा. यात सोशल मीडिया कोणत्याही राजकीय कामाशी संलग्न असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


मोदींशी न बोलताच ट्रम्प यांना चीनबद्दल भारताचा मूड कळाला? मध्यस्थीसाठी अमेरिकेचा उतावळेपणा


या ट्विटचा अर्थ, ट्रम्प लवकरच असे काही नियम लागू करेल, ज्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे मत दाबले अथवा लवपले तर त्यांच्यावर कारवाई करता येईल. डॉनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर फॅक्ट चेकचा इशारा दिल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक होत हा इशारा दिला आहे. याचा अर्थ ट्रम्प यांचा ट्विट चुकीचा असल्याचा ट्विटरचा दावा आहे. फेसबुकने मात्र दुसरी बाजू उचलल्याचे पाहायला मिळाले.


फेसबुक विरुद्ध ट्विटर
माझ्या मते फेसबुक किंवा कोणत्याही इंटरनेट प्लॅटफॉर्मने फॅक्ट चेक करण्या संदर्भात मध्यस्थाची भूमिक घ्यायला हवी. फॅक्ट चेक करणे ही अवघड गोष्ट आहे. लोकशाहित राजकीय भाषण ही संवेदनशील गोष्ट आहे. ती लोकांपर्यंत पोहचायला हवी की त्यांचा राजकीय नेत्याचे मत काय आहे, अशी भूमिका फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने मांडली आहे. मार्कने घेतलेली ही भूमिका डॉनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ जाणारी आहे. ट्विटरचा निर्णय हा फ्रिडम ऑफ स्पीचच्या विरोधात असल्याचे त्याने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात ट्विटर आणि फेसबुक विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.


India China Issue | चीनसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधानांशी संवाद नाही, सूत्रांची माहिती