World's Richest Man Elon Musk : टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest Man) बनले आहेत. मस्क यांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर उसळी घेतली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचं यादीतील पहिल्या क्रमांकावरील स्थान घसरून ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.
यावर्षी एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांनी लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये फ्रान्सचे अब्जाधीश आणि लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्टने यांनी मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता. पण मस्क पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत 'नंबर वन' ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर आणि बर्नार्ड ॲरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचली होती.
एलॉन मस्क यांची संपत्ती किती?
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एकूण 187 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बर्नार्ड ॲरनॉल्ट यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे. या वर्षी मस्क यांच्या एकूण संपत्ती वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याआधी त्यांच्या संपत्ती 50.1 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.
एलॉन मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. एलॉन मस्क (Elon Musk) एका वर्षात 180 अब्ज डॉलरने गमावणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यानंतर आता टेस्लाच्या शेअर्समध्ये बाजारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मस्क यांच्या संपत्तीत वाढ होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Girl Fight Video : एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल