मुंबई: ट्विटरची मालकी हाती आल्यापासून इलॉन मस्क त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळे चांगलाच चर्चेत आहे. आताही त्यांने ट्विटरच्या घटत्या महसुलावर भाष्य केलं आहे. ट्विटरवर कार्यरत असलेल्या अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्समुळे ट्विटरचं महसूल बुडाल्याचं इलॉन मस्क याने म्हटलं आहे. या अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्समुळे जाहिरातदारांवर दबाव निर्माण होतोय, त्यामुळे ट्विटरचं महसूल घटत असल्याचा आरोप त्याने केला आहे. आता हे अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्स म्हणजे नेमकं कोण हे मात्र त्याने स्पष्ट केलं नाही. 


इलॉन मस्क याने एक ट्वीट करत यावर भाष्य केलं आहे. इलॉन मस्कने म्हटलं आहे की, "अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सचा जाहिरातदारांवर दबाव असतो त्यामुळे ट्विटरचा महसूल घसरला आहे. या अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सना खुश करण्यासाठी आम्ही सर्वकाही केलं. कंटेंट मॉडरेशनमुळेही काहीच बदल झालेला नाही. सर्व काही करुनही जाहिरातदारांवर मोठा दबाव असल्याचं दिसून येतंय."


 






इलॉन मस्क याने आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक पोल घेतला होता. जाहिरातदारांनी कशाला महत्त्व दिलं पाहिजे असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. त्यामध्ये पहिला पर्याय होता की फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र, आणि दुसरा पर्याय होता की पॉलिटिकल करेक्टनेस म्हणजे राजकीय दृष्ट्या योग्य. इलॉन मस्कच्या या पोलवर अनेकांनी कमेंट केलं. त्यामध्ये सर्वाधिक समर्थन हे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मिळालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ 27,54,020 मतं म्हणजे 78.3 टक्के मतं पडली. 


ब्लू टिकसाठी रुपये मोजावे लागणार पैसे


ट्विटरची मालकी हातात घेतल्यानंतर इलॉन मस्‍कने (Elon Musk) यांनी ब्लू टिकसाठी (Twitter Blue Tick) पैसे आकारण्यात येण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. ब्लू टिकसाठी प्रत्येकाला प्रति महिना आठ डॉलर रुपये (भारतीय किंमतीनुसार 660 रुपये) शुल्क भरावं लागणार असल्याचं मस्कने सांगितलं. प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असेल असंही त्याने स्पष्ट केलं.